GK: महिलांच्या ड्रेसच्या आत छोट्या स्ट्रिप्स किंवा लूप्स का असतात? फॅशनसाठी नाही, तर 'हे' आहे कारण

Anushka Tapshalkar

ड्रेसमध्ये दिसणाऱ्या छोट्या लूप्स

महिलांच्या ड्रेसच्या खांद्याजवळ आतून किंवा पँटला कमरेच्या इथे सॅटिन, नायलॉन किंवा प्लास्टिकच्या छोट्या स्ट्रिप्स असतात. अनेकांना त्या फॅशनसाठी आहेत असे वाटते.

Hanger Loops Purpose and Benefits

|

sakal

काय म्हणतात?

या स्ट्रिप्सना किंवा लूप्सला तांत्रिक भाषेत हँगर लूप्स (Hanger Loops) असे म्हणतात.

Hanger Loops Purpose and Benefits

|

sakal

मुख्य उद्देश

या लूप्सचा उपयोग ड्रेस हँगरवर नीट टांगून ठेवण्यासाठी केला जातो, त्यामुळे कपडे घसरून खाली पडत नाहीत. विशेषतः सिल्की, ऑफ-शोल्डर किंवा वाईड नेक ड्रेसेस सहज घसरतात. या लूप्समुळे हे ड्रेसेस व्यवस्थित जागेवर राहतात.

Hanger Loops Purpose and Benefits

|

sakal

कपड्यांचा आकार टिकवून ठेवतात

नाजूक फॅब्रिक असलेल्या ड्रेसला थेट हँगरवर टांगल्यास खांद्याजवळ स्ट्रेचिंग होऊ शकते. या स्ट्रिप्स कपड्याचा मूळ आकार जपतात. विशेषत: स्पॅगेटी स्ट्रॅप, गाऊन किंवा हलक्या फॅब्रिकचे कपडे.

Hanger Loops Purpose and Benefits

|

sakal

महागडे कपडे सुरक्षित,आयुष्यात वाढ

सिल्क, सॅटिन किंवा हलक्या फॅब्रिकचे कपडे खाली पडल्यास खराब होऊ शकतात. हे लूप्स कपड्यांना ताण, फोल्ड किंवा घसरण्यापासून वाचवतात, परिणामी आकार आणि गुणवत्ता जास्त काळ टिकून राहते.

Hanger Loops Purpose and Benefits

|

sakal

दोन्ही बाजूंना लूप्स

ड्रेसच्या दोन्ही खांद्याजवळ प्रत्येकी एक लूप असतो, जेणेकरून हँगरच्या दोन्ही बाजूंना अडकवता येईल.

Hanger Loops Purpose and Benefits

|

sakal

वापरताना स्ट्रिप्स बाहेर दिसल्या तर?

त्या कापण्याऐवजी फक्त आतमध्ये नीट टक करा. गरज वाटल्यास छोटा सेफ्टी पिन वापरून त्यांना लपवू शकता.

Hanger Loops Purpose and Benefits

|

sakal

ड्रेस घालताना हात अडकतो!

कधी कधी हे लूप्स हातात अडकतात आणि ड्रेस घालायला उशीर होतो, पण त्यांचा उपयोग मात्र कपडे व्यवस्थित सांभाळण्यासाठीच असतो. त्यामुळे ड्रेस घालायला उशीर झाला तरी त्या कापू नका.

Hanger Loops Purpose and Benefits

|

sakal

GK: शूजच्या मागे छोटी पट्टी कशासाठी असते? ९९% लोकांना माहीतच नाही खरा उपयोग!

Shoes Loop Purpose and Benefits

|

sakal

आणखी वाचा