उत्पादक निर्यातीपूर्वी नवीन टायर थोडे का कापतात? जाणून घ्या कारण...

Mansi Khambe

आंतरराष्ट्रीय टायर बाजारपेठ

आंतरराष्ट्रीय टायर बाजारपेठ ही जगातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल-संबंधित व्यवसायांपैकी एक आहे. नवीन टायरपासून ते भंगार टायरपर्यंत, हा व्यापार प्रचंड मोठा आहे.

Tyres Manufacturers

|

ESakal

सीमाशुल्क फसवणूक

तुम्हाला माहित आहे का की या टायर व्यवसायात अनेक सीमाशुल्क फसवणुकींचाही समावेश आहे. ज्यात कापलेल्या नवीन टायरची निर्यात करणे समाविष्ट आहे?

Tyres Manufacturers

|

ESakal

टायरची निर्यात

जेव्हा टायरची निर्यात केली जाते, तेव्हा काही उत्पादक नवीन टायर कापून इतर देशांमध्ये पाठवतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नवीन टायर कापून त्यांना नुकसान पोहोचवण्याचे कारण काय?

Tyres Manufacturers

|

ESakal

युक्ती

टायरला काप देण्यामागील युक्ती म्हणजे पैसे वाचवणे. हे काप देऊन उत्पादक टायरचे नुकसान करत नाहीत, उलट आपला नफा वाढवतात.

Tyres Manufacturers

|

ESakal

नवीन टायर

जेव्हा टायर एका देशातून दुसऱ्या देशात पाठवले जातात, तेव्हा त्यांच्यावर विविध कर आकारले जातात. त्यामुळे, जेव्हा अगदी नवीन टायर पाठवले जातात.

Tyres Manufacturers

|

ESakal

शुल्क

तेव्हा त्यांना नवीन वस्तू म्हणून वर्गीकृत केले जाते. त्यांच्यावर वेगवेगळे शुल्क आकारले जाते. अशा परिस्थितीत उत्पादक टायरवर एक लहान काप देतात, जो सहजपणे दुरुस्त करून वापरता येतो.

Tyres Manufacturers

|

ESakal

भंगार

असे केल्याने टायरला 'नवीन वस्तू' या श्रेणीतून काढून 'भंगार' श्रेणीत टाकले जाते. यामुळे त्यावर आकारले जाणारे शुल्क लक्षणीयरीत्या कमी होते.

Tyres Manufacturers

|

ESakal

आयात कर

अशा प्रकरणांमध्ये, ते टायर कापून आयात करात लक्षणीय घट करतात. हे बेकायदेशीर असून सीमाशुल्क फसवणूक मानले जाते.

Tyres Manufacturers

|

ESakal

कटिंग फ्रॉड

व्यापाराच्या भाषेत याला "कटिंग फ्रॉड" किंवा "कॅटेगरी मिसडिक्लेरेशन" म्हणून ओळखले जाते. फसवणूक करणारे आयातदार नवीन महागड्या टायरच्या बीड किंवा साइडवॉलजवळ काप देतात.

Tyres Manufacturers

|

ESakal

खराब

ज्यामुळे ते वापरण्यायोग्य नाहीत असे दिसतात. परंतु पूर्णपणे खराब झालेले नसतात. अशा परिस्थितीत, कागदोपत्री तो टायर भंगार मानला जातो.

Tyres Manufacturers

|

ESakal

रबर स्क्रॅप

कापलेल्या टायरला कागदोपत्री 'रबर स्क्रॅप' किंवा 'कचरा' म्हणून घोषित केले जाते. या प्रकारात सीमा शुल्क खूप कमी असते, ज्यामुळे लक्षणीय कर बचत होते.

Tyres Manufacturers

|

ESakal

मजबूत पॅच

आयात केल्यानंतर विक्रेते टायर दुरुस्त करतात आणि बाजारात विकतात. त्यानंतर आतून रबर कंपाऊंड, हॉट व्हल्कनायझेशन किंवा मजबूत पॅच लावून लहान काप पुन्हा बंद केला जातो.

Tyres Manufacturers

|

ESakal

पेट्रोलप्रमाणे इथेनॉल एलपीजीमध्ये मिसळता येते का? विज्ञान काय सांगते? जाणून घ्या...

Ethanol Blended with LPG

|

ESakal

येथे क्लिक करा