सलूनमध्ये केस कापताना झोप का येते? जाणून घ्या वैज्ञानिक कारण...

Mansi Khambe

केस कापणे

केस कापणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे, पण केस कापताना तुम्हाला कधी झोप येते का? हा विषय सोशल मीडियावर अनेकदा चर्चेचा विषय बनतो.

Salon sleepiness

|

ESakal

वैज्ञानिक स्पष्टीकरण

यावर वेगवेगळी उत्तरे दिली जातात, पण असे का होते यामागे एक वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे. टाळू, जिथे मानवी केस असतात, ती खूप संवेदनशील असते.

Salon sleepiness

|

ESakal

स्पर्श

टाळूवरील केसांना कोणताही स्पर्श झाल्यास किंवा कंगवा फिरवल्यास त्याचा त्वरित परिणाम होतो. टाळूमध्ये नसांचे जाळे असते.

Salon sleepiness

|

ESakal

उपयुक्त

जेव्हा हलका स्पर्श केला जातो. तेव्हा आराम आणि प्रसन्नतेची भावना निर्माण होते. यामुळे शरीरात असे अनेक बदल घडून येतात, जे झोपेसाठी उपयुक्त ठरतात.

Salon sleepiness

|

ESakal

आराम

टाळूवर कात्री फिरवल्याने किंवा कंगवा फिरवल्याने डोक्याला आराम मिळतो. असे वाटल्याने शरीरातील चांगल्या हार्मोन्सचे अभिसरण वाढते.

Salon sleepiness

|

ESakal

कॉर्टिसोलची पातळी

टाळूची मालिश किंवा हाताच्या हालचालींमुळे डोपामाइन, सेरोटोनिन आणि ऑक्सिटोसिन सारखी रसायने स्रवतात. ज्यामुळे मनःस्थिती सुधारते. तणाव संप्रेरक कॉर्टिसोलची पातळी कमी होते.

Salon sleepiness

|

ESakal

रसायनांचा पूर

जेव्हा तुमचे केस लहान कापलेले असतात. तेव्हा तुमच्या मेंदूत आनंदी रसायनांचा पूर येतो. आरामाच्या भावनेमुळे झोप लागते. मानवी शरीरात दोन चेतासंस्था असतात.

Salon sleepiness

|

ESakal

पॅरासिम्पॅथेटिक चेतासंस्था

एक चेतासंस्था धोक्याच्या वेळी लढण्यासाठी किंवा पळून जाण्यासाठी तयार असते. दुसरी प्रणाली विश्रांती आणि पचनासाठी जबाबदार असते. तिला पॅरासिम्पॅथेटिक चेतासंस्था म्हणतात.

Salon sleepiness

|

ESakal

चेतासंस्था सक्रिय

जेव्हा न्हाव्याच्या हातांच्या हालचालीमुळे ही चेतासंस्था सक्रिय होते. तेव्हा ती विश्रांती आणि पचनाच्या अवस्थेत जाते. हृदयाचे ठोके थोडे मंदावतात, स्नायू शिथिल होतात आणि झोप येऊ लागते.

Salon sleepiness

|

ESakal

ऑक्सीटोसिन

शिवाय, सकारात्मक स्पर्शाने ऑक्सीटोसिन नावाचा हार्मोन स्रवतो. जरी त्यामुळे थेट झोप येत नसली तरी, शरीरात झोपेला चालना देणारी एक अवस्था निर्माण होते.

Salon sleepiness

|

ESakal

आरामदायक

झोप लागणे हे या गोष्टीचा पुरावा आहे की तुम्ही ज्या वातावरणात आहात, तिथे तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आणि आरामदायक आहात.

Salon sleepiness

|

ESakal

नैसर्गिक प्रक्रिया

हे अशक्तपणाचे लक्षण नाही, तर शरीरातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणून, पुढच्या वेळी जेव्हा असे होईल, तेव्हा ते अशक्तपणाचे किंवा तुमच्या शरीरातील नकारात्मक बदलांचे लक्षण नाही.

Salon sleepiness

|

ESakal

मसाज

ती एक अशी प्रक्रिया आहे जी तुमच्या मनाला आणि शरीराला एक प्रकारची मोफत थेरपी देत ​​आहे. म्हणूनच केस कापल्यानंतर डोक्याला मसाज केल्याने तुम्हाला अधिक झोप येऊ शकते.

Salon sleepiness

|

ESakal

बापरे 500 टन! एवढा जड पाऊस ढगांना कसा झेपतो?

cloud weight paradox

|

esakal

येथे क्लिक करा