जपानमध्ये लोक रात्री अंघोळ का करतात?

Shubham Banubakode

रात्रीची आंघोळ

जपानमध्ये अनेक लोक सकाळी नाही, तर संध्याकाळी किंवा रात्री अंघोळ करतात. दिवसाचा थकवा घालवण्यासाठी ही सवय खास मानली जाते.

Why do people in Japan take a bath at night

|

esakal

बाथटब

जपानमध्ये थेट बाथटबमध्ये जाण्याची पद्धत नाही. आधी साबणाने अंग स्वच्छ धुतात आणि मग गरम पाण्यात बसून आंघोळ करतात.

Why do people in Japan take a bath at night

|

esakal

‘ओफुरो’ म्हणजे काय?

जपानच्या पारंपरिक अंघोळीच्या पद्धतीला ‘ओफुरो’ म्हणतात. यात शरीर धुण्यापेक्षा गरम पाण्यात काही वेळ शांत बसण्याला जास्त महत्त्व असतं.

Why do people in Japan take a bath at night

|

esakal

दिवसभराचा थकवा

काम, अभ्यास किंवा बाहेर फिरून आल्यानंतर शरीर दमलेलं असतं. गरम पाण्यात काही वेळ बसल्याने शरीराला आणि मनाला आराम मिळतो.

Why do people in Japan take a bath at night

|

esakal

फायदा

रात्री गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर शरीर हळूहळू निवांत होतं. त्यामुळे काही लोकांना झोपण्याआधी रिलॅक्स वाटतं आणि झोपही चांगली लागू शकते.

Why do people in Japan take a bath at night

|

esakal

बाथटबचा वापर

जपानमध्ये बाथटब हा शरीर धुण्यासाठी नसतो, तर आराम करण्यासाठी असतो. त्यामुळे आधी बाहेर शरीर स्वच्छ धुण्याची पद्धत पाळली जाते.

Why do people in Japan take a bath at night

|

esakal

स्वच्छतेला महत्त्व

घरात शिरताना चप्पल काढण्यापासून सार्वजनिक ठिकाणं स्वच्छता ठेवण्यापर्यंत जपानमध्ये स्वच्छतेला महत्त्व दिलं जातं. अंघोळीची पद्धतही त्याचाच भाग आहे.

Why do people in Japan take a bath at night

|

esakal

सकाळी अंघोळच नाही?

असं अजिबात नाही. काही जपानी लोक सकाळीही अंघोळ करतात. पण रात्री अंघोळ करून स्वच्छ आणि रिलॅक्स होऊन झोपण्याची सवय लोकप्रिय आहे.

Why do people in Japan take a bath at night

|

esakal

महाराष्ट्रातल्या 'या' गावात औरंगजेब झाला होता लंगडा

Aurangzeb Became Lame in Maharashtra

|

esakal

हेही वाचा -