Anushka Tapshalkar
रात्री झोपताना मोबाईल उशीखाली किंवा बेडवर ठेवण्याऐवजी काचेच्या ग्लासात ठेवण्याची ट्रिक सध्या चर्चेत आहे. नेमका काय फायदा होतो? जाणून घ्या 8 कारणं!
Why People are Keeping Phones in Glass at Night
sakal
काचेच्या ग्लासामुळे मोबाईलच्या स्पीकरचा आवाज काही प्रमाणात अधिक घुमू शकतो. त्यामुळे अलार्मचा आवाज स्पष्ट ऐकू येण्यास मदत होते आणि सकाळी उठणं सोपं होऊ शकतं.
Alarm
sakal
मोबाईल बेडपासून थोडा दूर ग्लासात ठेवल्यामुळे अलार्म बंद करण्यासाठी तुम्हाला उठून टेबलपर्यंत जावं लागतं. त्यामुळे पुन्हा-पुन्हा स्नूझ करण्याची सवय कमी होण्यास मदत होऊ शकते.
Alarm Snooze
sakal
उशीजवळ किंवा बेडवर मोबाईल ठेवण्याऐवजी तो टेबलवर ग्लासात ठेवल्यास झोपताना वारंवार फोन हातात घेण्याची सवय कमी होऊ शकते.
Why People are Keeping Phones in Glass at Night
sakal
झोपण्यापूर्वी सोशल मीडिया स्क्रोल करण्याची सवय असेल, तर मोबाईल दूर ठेवल्यामुळे प्रत्येक नोटिफिकेशन तपासण्याचा मोह कमी होतो. यामुळे चांगलं बेडटाइम रुटीन तयार करण्यास मदत होऊ शकते.
Break from Nighttime Scrolling
मोबाईल टेबलवर थेट ठेवला असता कॉल किंवा मेसेजच्या व्हायब्रेशनमुळे खडखडाट होऊ शकतो. ग्लासातील फोनमुळे हा आवाज काही प्रमाणात बदलू किंवा कमी जाणवू शकतो.
Why People are Keeping Phones in Glass at Night
sakal
मोबाईल उशीखाली किंवा डोक्याजवळ ठेवण्याऐवजी बेडपासून दूर टेबलवर ठेवणं अधिक योग्य आहे. मात्र, काचेचा ग्लास रेडिएशनपासून संरक्षण करतो, असा ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. फायदा मुख्यतः मोबाईल शरीरापासून दूर ठेवण्यात आहे.
Why People are Keeping Phones in Glass at Night
sakal
टेबलवर मोबाईल थेट ठेवल्यास तो हात लागून खाली पडू शकतो. पण या ट्रिकला फॉलो केल्याने फोन खाली पडण्याचा धोका कमी होऊ शकतो; मात्र ग्लास स्थिर आणि सुरक्षित ठेवा, कारण तो फुटल्यास फोनचे नुकसान होऊ शकते.
Why People are Keeping Phones in Glass at Night
sakal
ही ट्रिक मोबाईल बेडपासून दूर ठेवण्यासाठी उपयोगी ठरू शकते. मात्र, ग्लास आरोग्याचे संरक्षण करतो, याचा वैज्ञानिक पुरावा नाही.
Why People are Keeping Phones in Glass at Night
sakal
Tips to Keep Salt and Sugar Dry in Monsoon
sakal