ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना डॉक्टर उलटे चालत का जातात? जाणून घ्या

Anushka Tapshalkar

डॉक्टर उलटे चालताना तुम्ही पाहिलंय का?

ऑपरेशनपूर्वी काही डॉक्टर स्क्रबिंग केल्यानंतर पुढे न चालता कधी कधी मागे चालताना दिसतात. यामागे एक महत्त्वाचं कारण आहे.

Surgeons Entering OT walking backwards

|

sakal

याला ‘स्टेराइल टेक्निक’शी जोडलेलं आहे

डॉक्टर हात आणि हाताच्या बाहू व्यवस्थित स्क्रब केल्यानंतर त्यांचा निर्जंतुकपणा म्हणजेच Sterility टिकवणं अत्यंत महत्त्वाचं असतं.

Sterile Technique

|

sakal

हात कुठेही लागू नयेत, याची काळजी

स्क्रबिंगनंतर हात आणि बाहू भिंत, दरवाजा किंवा इतर वस्तूंना लागल्यास त्यांचा स्टेराइलपणा धोक्यात येऊ शकतो.

Maintaining Sterility

|

sakal

गाऊन घातल्यानंतरही काळजी कायम

स्टेराइल गाऊन घातल्यानंतर त्याच्या पुढील भागाला अनावश्यक वस्तू किंवा व्यक्तीचा संपर्क होऊ नये, याची विशेष काळजी घेतली जाते.

Surgical Gown

|

sakal

मग डॉक्टर मागे का चालतात?

दरवाजा उघडताना किंवा बाहेर पडताना पुढे वळल्यास हात किंवा गाऊनचा स्टेराइल भाग एखाद्या वस्तूला लागण्याची शक्यता असते. त्यामुळे काही परिस्थितीत ते मागे सरकतात.

Operation Room Sterility

|

sakal

उद्देश एकच—स्टेरिलिटी टिकवणे!

ऑपरेशन थिएटरमध्ये संसर्गाचा धोका कमी ठेवण्यासाठी स्टेराइल क्षेत्र अबाधित ठेवणं महत्त्वाचं असतं. मागे चालण्याची पद्धत त्यातील एक खबरदारीची पायरी असू शकते.

Surgical Sterility Maintenance

|

sakal

हा काही विचित्र ‘रिच्युअल’ नाही!

डॉक्टर मागे चालताना दिसले, तर त्यामागे अंधश्रद्धा किंवा विचित्र परंपरा नसते. रुग्णाच्या सुरक्षिततेसाठी स्टेराइल वातावरण टिकवण्याचा हा एक भाग आहे.

Operating Room Hygiene Practices

|

sakal

गरम तेल की थंड? केसांच्या वाढीसाठी कोणती मालिश ठरते फायदेशीर?

Hot Oil VS Cold Oil for Hair Growth

|

sakal

आणखी वाचा