वाघ आपल्या शिकारीला पाण्यात का ओढतो?

संतोष कानडे

शिकारी

वाघ हा उत्तम शिकारी असून त्याला पाण्याची अजिबात भीती वाटत नाही.

वाघ

अनेकदा शिकार केल्यानंतर वाघ आपले भक्ष्य पाण्याजवळ किंवा पाण्यात घेऊन जातो.

पाण्याचा आधार

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी तो पाण्याचा आधार घेतो. पाण्याजवळ बसून त्याला आरामात भक्ष्य खाता येते.

भक्ष्य

पाण्यात भक्ष्य नेल्याने इतर काही प्राण्यांपासून ते दूर ठेवण्यास मदत होऊ शकते.

पोहणे

वाघाला पोहता येत असल्यामुळे पाण्यातून भक्ष्य ओढणे त्याच्यासाठी शक्य असते.

ताकद

मोठ्या शिकारीला एका जागेवरून दुसरीकडे नेण्यासाठी तो आपली ताकद वापरतो.

सुरक्षित जागी

वाघ अनेकदा भक्ष्य झाडाझुडपांत किंवा सुरक्षित जागीही घेऊन जातो.

फंडे

मात्र प्रत्येक वेळी वाघ शिकार पाण्यातच नेतो असे नाही. त्याचे शिकारीचे वेगवेगळे फंडे आहेत.

जीवनशैली

पाण्याशी असलेली जवळीक ही वाघाच्या जीवनशैलीतील एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे.

वाघीण आपल्या बछड्यांना वडिलांपासून दूर का ठेवते?

tiger

|

esakal

<strong>येथे क्लिक करा</strong>