ट्रेनच्या खिडक्यांना काच असूनही लोखंडी जाळ्या का लावल्या जातात?

Mansi Khambe

रेल्वेची खिडकी

मुंबई लोकल ट्रेन असो किंवा मेल/एक्सप्रेस ट्रेन यामधून प्रत्येकाने प्रवास केला असेलच. रेल्वेच्या खिडकीजवळ बसून प्रवास करण्यास अनेकांना आवडते.

Train Window

|

ESakal

लोखंडी जाळी

मात्र एक गोष्ट तुमच्या कदाचित लक्षात आली नसेल, ती म्हणजे अनेक ट्रेनच्या खिडक्यांना काचेसोबत लोखंडी जाळीही बसवलेली असते. खिडकीत आधीच काच असताना लोखंडी जाळीची गरज का असते?

Train Window

|

ESakal

संरक्षण

खरं तर, जेव्हा ट्रेन वेगाने धावते तेव्हा जवळच्या लहान-मोठ्या वस्तू खिडकीला आदळू शकतात किंवा रेल्वे रुळाच्या बाजूचे दगड, इतर वस्तू खिडकीवर आदळून उडू शकतात.

Train Window

|

ESakal

आघात

जर खिडकीची काच कमकुवत असेल किंवा आघातामुळे फुटली, तर तिचे तुकडे आत असलेल्या प्रवाशांना इजा पोहोचवू शकतात. अशावेळी एक मजबूत जाळी संरक्षणाचा एक अतिरिक्त थर म्हणून काम करू शकते.

Train Window

|

ESakal

धोकादायक कृत्य

तसेच प्रवाशांना बाहेरचे दृश्य पाहण्यासाठी ट्रेनच्या खिडकीतून हात आणि डोके बाहेर काढण्यापासून रोखण्यास खिडक्यांना लावलेल्या जाळ्यामदत करतात.

Train Window

|

ESakal

वस्तू खाली पडण्याचा धोका

प्रवासी अनेकदा त्यांचे मोबाईल फोन, पाण्याच्या बाटल्या, खेळणी किंवा इतर लहान वस्तू घेऊन खिडकीजवळ बसतात. यावेळी खिडक्यांना लावलेल्या जाळ्या मोठ्या वस्तू बाहेर फेकल्या जाण्यापासून रोखतात.

Train Window

|

ESakal

एकसारख्या खिडक्या

तसेच तुमच्या लक्षात आले असेल की, सर्व डब्यांच्या खिडक्या सारख्या नसतात. काही जुन्या डब्यांमध्ये लोखंडी जाळ्या आणि काचेच्या खिडक्या असतात. याउलट, अनेक आधुनिक एसी डब्यांमध्ये न उघडणाऱ्या काचेच्या बंद खिडक्या असतात.

Train Window

|

ESakal

रचना

हे डब्याची रचना, सुरक्षितता आणि वापराच्या गरजांमुळे असते. एसी डब्यांमधील बंद खिडक्यांमुळे बाहेरची धूळ, आवाज आणि गरम हवा आत येण्यापासून रोखण्यासही मदत होते.

Train Window

|

ESakal

मंत्री चंद्रकांत पाटील यांची एकूण संपत्ती किती? सतेज पाटलांना सुनावल्यानंतर संपत्तीचा आकडा आला समोर

Chandrakant Patil's net worth

|

Sakal

येथे क्लिक करा