पुजा बोनकिले
एखादी व्यक्ती अन्नाशिवाय अनेक दिवस जगू शकते, परंतु एक दिवसही पाण्याशिवाय राहणे धोकादायक ठरू शकते.
डिहायड्रेशनमुळे थकवा येतो आणि काही प्रकरणांमध्ये ते प्राणघातक ठरू शकते. म्हणूनच बहुतेक लोक पाण्याची बाटली सोबत ठेवतात.
Drink Water
जर तुम्ही कधी बाटलीबंद पाणी विकत घेतले असेल, तर तुम्हाला वेगवेगळ्या रंगांचे झाकण दिसले असतील. निळा, हिरवा, पांढरा, काळा किंवा पिवळा. जरी बरेच लोक असे गृहीत धरतात की हे रंग ब्रँडिंगशी जोडलेले आहेत, परंतु ते प्रत्यक्षात आतील पाण्याचा प्रकार किंवा गुणवत्ता दर्शवतात.
पाण्याच्या बाटल्यांच्या पांढऱ्या झाकणाचा अर्थ असा की हे पाणी मशीनद्वारे शुद्ध केलेल आहे.
हिरवे झाकण म्हणजे चवदार पाणी. ते चवीसाठी वाढवलेले आणि पिण्यास सुरक्षित आहे, परंतु ते खनिज पाण्याइतके शुद्ध नाही.
निळा झाकण खनिज पाण्याचे संकेत देते, जे सहसा नैसर्गिक झऱ्यांमधून येते आणि फायदेशीर खनिजांनी समृद्ध असते.
काळं झाकण असलेल्या बॉटलमधील पाणी अल्कलाइन असतं. हे पाणी शरीरासाठी अधिक फायदेशीर असून इतर पाण्याच्या बाटल्यांपेक्षा महाग असतं.
पिवळी झाकण म्हणजे जीवनसत्त्वांनी समृद्ध पाणी, जे ऊर्जा वाढवण्यासाठी आणि निरोगीपणाला आधार देण्यासाठी जीवनसत्त्वे आणि इलेक्ट्रोलाइट्सने भरलेले असते.
Haemoglobin
Sakal