होळीच्या अग्नीत नारळच का अर्पण करतात? जाणून घ्या त्यामागचा धार्मिक इतिहास

Aarti Badade

होळी आणि नारळाचे नाते

हिंदू धर्मात होळी या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. होळीच्या पूजेमध्ये 'नारळ' हा अविभाज्य घटक मानला जातो, पण त्यामागे नेमकी कारणे काय आहेत?

Holi coconut significance

|

Sakal

शुभ कार्याची सुरुवात

हिंदू संस्कृतीत नारळाला 'श्रीफळ' मानले जाते. कोणत्याही शुभ कार्याची किंवा नवीन कामाची सुरुवात ही नारळ फोडूनच केली जाते.

Holi coconut significance

|

sakal

मंगलमय वातावरणासाठी

होळीच्या अग्नीत नारळ अर्पण करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे सर्व काही मंगलमय घडावे. आयुष्यातील नवीन सुरुवातीला देवाचा आशीर्वाद मिळावा, ही त्यामागील भावना असते.

Holi coconut significance

|

Sakal

नकारात्मक शक्तींचा नाश

असे मानले जाते की, होळीच्या पवित्र अग्नीत नारळ अर्पण केल्याने घरातील आणि मनातील सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि सकारात्मकता येते.

Holi coconut significance

|

Sakal

दोषांपासून मुक्ती

धार्मिक समजुतीनुसार, होळीत नारळ अर्पण केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील किंवा वास्तूतील विविध दोष दूर होतात आणि कामात येणारे अडथळे दूर होतात.

Holi coconut significance

|

Sakal

ईडा-पिडा टळते

"ईडा-पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो" अशी प्रार्थना करत होळीत नारळ फोडला जातो. यामुळे कुटुंबावर येणारी संकटे आणि आजारपण दूर होते, अशी श्रद्धा आहे.

Holi coconut significance

|

Sakal

त्यागाचे प्रतीक

नारळ फोडणे हे आपल्या अहंकाराचा त्याग करण्याचे प्रतीक आहे. अग्नीला नारळ अर्पण करून आपण आपले सर्व वाईट विचार होळीत जाळून टाकतो.

Holi coconut significance

|

Sakal

परंपरा जोपासा

यंदाची होळी साजरी करताना या धार्मिक परंपरांचा अर्थ समजून घ्या आणि उत्साहाने सण साजरा करा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला होळीच्या शुभेच्छा!

Holi coconut significance

|

Sakal

अहिल्यानगरचा अभिमान! शहाजीराजांच्या स्वराज्याचा साक्षीदार आहे 'हा' भव्य किल्ला

Pemgiri Fort Ahmednagar history

|

Sakal

येथे क्लिक करा