Pranali Kodre
बऱ्याचदा आपण पाहातो की अनेक लोकांना तिखट खाण्याची सवय असते किंवा त्यांना तिखट खायला आवडतं. पण असं होण्यामागेही कारण आहे.
Spicy Food Craving
Sakal
खरंतर मिरचीमध्ये कॅप्सेसिन हे रसायन असते. हे रसायन जिभेवरील 'TRPV1' नावाच्या उष्णता व वेदना ओळखणाऱ्या संवेदनशील रिसेप्टर/आयन चॅनेलला (Sensory Receptors) सक्रिय करते.
Spicy Food Craving
Sakal
कॅप्सेसिनमुळे मेंदुला जळजळ किंवा उष्णता होत असल्याचा संदेश मिळतो, पण वारंवार तिखट खाल्ल्याने ही जळजळ तुलनेने कमी जाणवू शकते.
Spicy Food Craving
Sakal
जेव्हा मेंदुला जळजळीमुळे वेदना झाल्यासारखे वाटते, तेव्हा बचाव करण्यासाठी एंडॉर्फिन (Endorphins) आणि डोपामाइन (Dopamine) सारखी आनंदाची रसायने सोडतो.
Spicy Food Craving
Sakal
या आनंद देणाऱ्या रसायनांमुळे काही लोकांना तिखट खाल्ल्यानंतर आनंददायी किंवा उत्साही वाटते.
Spicy Food Craving
Sakal
तसेच मानसोपशास्त्रानुसार माणसाला ज्यामध्ये धोका वाटतो पण प्रत्यक्षात कोणतीही इजा होत नाही अशा गोष्टींचा आनंद घ्यायला आवडतो.
Spicy Food Craving
Sakal
तसेच सतत तिखट खाल्याने जिभेवरील वेदना ओळखणाऱ्या चेतासंस्था (TRPV1 Receptors) हळूहळू सुन्न किंवा कमी संवेदनशील होतात.
Spicy Food Craving
Sakal
तिखटामुळे तोंडात लाळ जास्त निर्माण होते आणि जेवण चवदारही वाटते.
Spicy Food Craving
Sakal
याशिवाय तिखट खाल्ल्यानंतर निर्माण होणाऱ्या एंडॉर्फिनमुळे मानसिक ताण आणि थकवा कमी होण्यास मदत होते. त्यामुळे तणावात अनेकांना चटपटीत खायलाही आवडते.
Spicy Food Craving
Sakal
या सर्व कारणांमुळे अनेकदा लोकांना तिखट खाण्याची सवय होते किंवा आवड लागते.
Spicy Food Craving
Sakal
मात्र अति तिखट आरोग्यासाठी फारसं चांगलं नसते. त्याचे अनेक तोटेही आहेत.
Spicy Food Craving
Sakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Spicy Food Craving
Sakal
Why Does Chilli Taste Spicy?
Sakal