मिरची चवीला तिखटच का लागते?

Pranali Kodre

मिरची

मिरचीची चव तिखट आहे, हे तर सर्वांनाच माहिती आहे. पण मिरची तिखट लागण्यामागे काही कारणंही आहेत.

Why Does Chilli Taste Spicy?

|

Sakal

कॅप्सायसिन (Capsaicin) रसायन

मिरचीमध्ये कॅप्सायसिन नावाचे रासायनिक संयुग (Chemical Compound) असते, जे मिरचीच्या तिखटपणाचे मुख्य कारण आहे.

Why Does Chilli Taste Spicy?

|

Sakal

कुठे असते कॅप्सायसिन?

मिरचीच्या बियांपेक्षाही तिच्या आतल्या पांढऱ्या मऊ शिरांमध्ये (Placenta) कॅप्सायसिन सर्वाधिक असते.

Why Does Chilli Taste Spicy?

|

Sakal

जिभेवरील 'TRPV1' पेशी सक्रिय

हे कॅप्सायसिन जेव्हा आपल्या जिभेच्या संपर्कात येते, तेव्हा जिभेवरील 'TRPV1' नावाच्या उष्णता व वेदना ओळखणाऱ्या पेशींना (Sensory Receptors)ते सक्रिय करते.

Why Does Chilli Taste Spicy?

|

Sakal

तिखट स्वतंत्र चव नाही!

तिखट ही स्वतंत्र चव नाही, पण ती जळजळीची संवेदना आहे. कॅप्सायसिनमुळे मेंदुला जळजळ किंवा उष्णता होत असल्याचा संदेश मिळतो.

Why Does Chilli Taste Spicy?

|

Sakal

पाण्याने तिखटपणा कमी होत नाही

कॅप्सायसिन हे पाण्यात विरघळत नाही, त्यामुळे पाणी प्यायल्यानंतरही जळजळ कमी होत नाही. ते चरबी किंवा तेलात विरघळते.

Why Does Chilli Taste Spicy?

|

Sakal

दूध किंवा दह्याने आराम

दुधात केसीन (Casein) नावाचे प्रथिन कॅप्सायसिनला जिभेकडून वेगळे करते, त्यामुळे तिखट लागल्यावर दूध, दही किंवा तूप खाल्याने आराम मिळतो.

Why Does Chilli Taste Spicy?

|

Sakal

स्कोव्हिल हिट युनिट

मिरचीचा तिखटपणा मोजण्यासाठी 'स्कोव्हिल हिट युनिट' (SHU) हे परिमाण वापरले जाते.

Why Does Chilli Taste Spicy?

|

Sakal

नैसर्गिक संरक्षण कवच

वनस्पतीशास्त्रानुसार कीटक किंवा जनावरांनी मिरची खाऊ नये म्हणून निसर्गाने कॅप्सायसिन हे नैसर्गिक संरक्षण कवच दिल्याचे म्हटले दाते. पण याचा परिणाम पक्षांवर होत नाही.

Why Does Chilli Taste Spicy?

|

Sakal

समुद्राचं पाणी खारट का असतं?

Why Is Sea Water Salty?

|

Sakal

येथे क्लिक करा