पुजा बोनकिले
अनेकवेळा आपण एखाद्या व्यक्तीशी जास्त बोलायला लागतो. अस का होते यामागील मानशास्त्र समजून घेऊया.
दोघांमध्ये विचारांची, भावना आणि स्वभावांची जुळवाजुळव असते. त्यामुळे त्या व्यक्तीशी बोलणं सहज आणि सुखद वाटतं.
त्या व्यक्तीसोबत असताना आपण सुरक्षितपणे आणि न घाबरता बोलू शकतो.
त्या व्यक्तीकडून मिळणारी सकारात्मकता आणि आनंद आपल्याला सतत आकर्षित करत असते.
समोरची व्यक्ती आपल्याला न बोलताही समजते, त्यामुळे तिच्याशी बोलावंसं वाटतं.
एकटे किंवा निराश वाटत असताना आपण त्या व्यक्तीकडे आपोआप ओढले जातो कारण ती आपल्याला आधार देते.
रोजच्या संवादामुळे सवय होते आणि न बोलल्यास करमत नाही किंवा अस्वस्थ वाटते.
काही वेळा ही भावना आकर्षण, मैत्री किंवा प्रेम असू शकते. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीशी वारंवार बोलावे वाटते.
आपण व्यक्तीसमोर कोणताही मुखवटा न घालता मुक्तपणे बोलू शकतो.