सकाळ डिजिटल टीम
झोप लागताना शरीर हलकंसं हादरतं यालाच हायप्निक जर्क म्हणतात. हे सामान्य नैसर्गिक क्रिया आहे.
मेंदू झोपेत जातो पण शरीर अजून जागं असतं त्यामुळे पडल्याचा भास होतो.
अतिश्रम, थकवा किंवा तणाव असल्यास हे जास्त वेळा होऊ शकतं.
मोबाईल, टीव्ही किंवा कॉफीमुळे मेंदू शांत होत नाही त्यामुळे झोपताना हलकी झटका देणारी भावना निर्माण होते.
मेंदू शरीराला झोपेचा सिग्नल देतो, पण नर्व्हज अर्धवट अॅक्टिव्ह राहत असल्यामुळे अचानक पडल्याचा भास होतो.
भरपेट जेवण करून झोपल्यास शरीरात हालचाल जास्त जाणवते त्यामुळे तो झटका अधिक तीव्र वाटतो.
हार्मोनल बदलांचा प्रभाव विशेषत किशोरावस्था किंवा तणावग्रस्त काळात हे जास्त प्रमाणात जाणवतं.
हे एक सामान्य नैसर्गिक झोपेचा भाग आहे दरवेळी काहीही धोका नसतो.