Aarti Badade
जेव्हा आपण अन्न किंवा पेय जलदगतीने सेवन करतो, तेव्हा डायफ्रामला उत्तेजित होऊन ते आकुंचन पावतो.
गरम किंवा तिखट पदार्थ खाल्ल्याने देखील डायफ्रामला उत्तेजित होऊन उचकी लागते.
ताण किंवा चिंता यामुळे डायफ्राममध्ये ताण निर्माण होऊ शकतो आणि उचकी लागते.
अपचनामुळे डायफ्रामवर दबाव वाढू शकतो आणि उचकी लागते.
मद्यपानामुळे डायफ्राम आणि संबंधित नसांवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे उचकी लागू शकते.
गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या बदलांमुळे डायफ्रामवर दबाव येऊ शकतो, ज्यामुळे लागू शकते.
काही औषधे डायफ्रामला उत्तेजित करू शकतात, ज्यामुळे उचकी लागू शकते.