जेवताच डोळे मिटतात? शरीर देत आहे 'हे' महत्त्वाचे संकेत!

Aarti Badade

जेवणानंतर लगेच झोप येते?

ही फक्त थकव्याची नाही, तर तुमच्या आहार आणि जीवनशैलीशी संबंधित कारणांचीही खूण असू शकते.

Sleepy After Meals

|

Sakal

रक्तातील साखरेतील चढ-उतार

जेवल्यानंतर रक्तातील साखर झपाट्याने वाढून नंतर कमी झाली, तर थकवा, सुस्ती आणि झोप येण्याची शक्यता वाढते.

Sleepy After Meals

|

Sakal

कार्बोहायड्रेट्स जास्त खाता का?

भात, पोळी, गोड पदार्थ किंवा मैद्याचे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास इन्सुलिनची पातळी वाढते आणि झोप येऊ शकते.

Sleepy After Meals

|

Sakal

ट्रिप्टोफॅनयुक्त पदार्थ

दूध, दही आणि अंडी यांसारख्या पदार्थांमध्ये ट्रिप्टोफॅन असते. हे मेंदूमध्ये विश्रांती आणि झोपेशी संबंधित रसायनांचे उत्पादन वाढवू शकते.

Sleepy After Meals

|

Sakal

पचनासाठी वाढलेला रक्तप्रवाह

जेवणानंतर शरीराचा अधिक रक्तप्रवाह पचनसंस्थेकडे वळतो. त्यामुळे काहींना थकवा आणि सुस्ती जाणवू शकते.

Sleepy After Meals

|

Sakal

झोप आणि पाण्याची कमतरता

रात्री अपुरी झोप किंवा दिवसभर कमी पाणी प्यायल्यास जेवणानंतर अधिक झोप येण्याची शक्यता वाढते.

Sleepy After Meals

|

Sakal

अवेळी जेवण आणि हार्मोन्स

अनियमित जेवणाच्या वेळा आणि जेवणानंतर होणारे हार्मोन्समधील बदल यामुळे शरीराला विश्रांतीची गरज वाटू शकते.

Sleepy After Meals

|

Sakal

कधी घ्यावा डॉक्टरांचा सल्ला?

जर प्रत्येक जेवणानंतर तीव्र झोप, अशक्तपणा किंवा सतत सुस्ती जाणवत असेल, तर मधुमेह, थायरॉईड किंवा इतर आरोग्य समस्यांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Sleepy After Meals

|

Sakal

अॅसिडिटीने त्रासलात? आयुर्वेदानुसार असा करा 'या' फळाचा आहारात समावेश

sapodilla chikoo benefits

|

Sakal

येथे क्लिक करा