चॅटमधला शेवटचा मेसेज पुन्हा पुन्हा वाचता का? मानसिक आजाराचं लक्षण

Shubham Banubakode

अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न

मेसेजमध्ये आवाज, चेहऱ्यावरील हावभाव किंवा बोलण्याचा टोन नसतो. त्यामुळे समोरच्याचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी मेंदू तो मेसेज पुन्हा वाचतो.

Why Do You Repeatedly Read the Last Chat Message

|

esakal

गैरसमज होण्याची भीती

आपण काही चुकीचं लिहिलं का किंवा समोरच्या व्यक्तीने वेगळा अर्थ तर काढला नसेल ना, अशी शंका अनेकांना सतावत असते. त्यामुळे मेसेज पुन्हा पाहण्याची सवय लागते.

Why Do You Repeatedly Read the Last Chat Message

|

esakal

नैसर्गिक गरज

प्रत्येकाला इतरांनी आपल्याला समजून घ्यावं आणि स्वीकारावं असं वाटतं. त्यामुळे आपण पाठवलेला मेसेज योग्य आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी तो पुन्हा वाचला जातो.

Why Do You Repeatedly Read the Last Chat Message

|

esakal

ओव्हरथिंकिंगमुळे वाढते सवय

जास्त विचार करण्याची सवय असलेल्या लोकांमध्ये हा प्रकार अधिक दिसून येतो. ते छोट्या गोष्टींचाही वारंवार विचार करत राहतात.

Why Do You Repeatedly Read the Last Chat Message

|

esakal

कुणामध्ये दिसतो स्वभाव?

प्रत्येक गोष्ट अगदी योग्य आणि परिपूर्ण व्हावी, अशी अपेक्षा असणारे लोक आलेले किंवा पाठवलेले मेसेज अनेकदा तपासतात.

Why Do You Repeatedly Read the Last Chat Message

|

esakal

अनिश्चितता कमी करण्याचा प्रयत्न

समोरून उत्तर उशिरा आल्यास किंवा मेसेजचा अर्थ स्पष्ट नसल्यास, मेंदू पुन्हा पुन्हा तोच मेसेज वाचून परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतो.

Why Do You Repeatedly Read the Last Chat Message

|

esakal

कोणते मेसेज वाचले जातात?

जवळच्या व्यक्ती, मित्र किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीचे मेसेज लोक अनेकदा पुन्हा वाचतात. त्यामागे भावनिक जवळीक आणि त्या नात्याचं महत्त्व हे कारण असतं.

Why Do You Repeatedly Read the Last Chat Message

|

esakal

मानसिक आजाराचं लक्षण?

एक-दोन वेळा मेसेज पुन्हा वाचणं ही अगदी सामान्य गोष्ट आहे. मात्र, यामुळे दैनंदिन आयुष्यावर परिणाम होत असेल, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं ठरू शकतं.

Why Do You Repeatedly Read the Last Chat Message

|

esakal

तज्ज्ञांचा सल्ला

वरील माहिती सामान्या माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Why Do You Repeatedly Read the Last Chat Message

|

esakal

युद्ध झाल्यास सोन्याचे दर का वाढतात? सोप्प्या शब्दांत समजून घ्या...

Gold

|

esakal

हेही वाचा -