दुसऱ्याला जांभई देताना पाहून आपल्यालाही जांभई का येते? 'हे' आहे कारण

Anushka Tapshalkar

दुसऱ्याला पाहून आपल्यालाही जांभई

एखाद्याला जांभई देताना पाहिलं की काही क्षणांत आपल्यालाही जांभई येते. विशेष म्हणजे, आपण थकलेलो नसलो तरी असं होऊ शकतं! पण दुसऱ्याची जांभई पाहून आपल्यालाही जांभई येण्यामागे नेमकं काय कारण आहे?

why do you yawn when you see someone else yawning

|

sakal

मेंदूचा मिरर न्यूरॉन प्रभाव

मिरर न्यूरॉन्स दुसऱ्यांच्या कृती पाहताना सक्रिय होतात. त्यामुळे दुसऱ्याला जांभई देताना पाहून आपल्यालाही जांभई येऊ शकते. मात्र, या प्रक्रियेमागील नेमकी यंत्रणा अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेली नाही.

Mirror Neuron Effect

|

sakal

भावनिक नात्याचा संबंध

काही संशोधनांनुसार, जवळच्या मित्रांना किंवा कुटुंबीयांना जांभई देताना पाहून आपल्यालाही जांभई येण्याची शक्यता असते. मात्र, हा संबंध प्रत्येक व्यक्तीमध्ये सारखाच दिसत नाही.

Empathy Connection

|

sakal

थकवा आणि अपुरी झोप

पुरेशी झोप न झाल्यास किंवा शरीर थकल्यास वारंवार जांभई येऊ शकते. झोप आणि जागृतावस्थेतील बदलांचाही जांभईशी संबंध असतो.

Fatigue & Inadequate Sleep

|

sakal

ऑक्सिजन असंतुलन

जांभई आल्यावर शरीरात ऑक्सिजनची कमतरता झाली आहे, असं अनेकांना वाटतं. मात्र, जांभई येण्याचं मुख्य कारण ऑक्सिजनची कमतरता असल्याचा ठोस वैज्ञानिक पुरावा नाही.

Oxygen Levels

|

sakal

आयुर्वेदात काय म्हणलंय

आयुर्वेदात जांभईला ‘जृम्भा’ किंवा ‘जुंभा’ असं म्हटलं जातं. पारंपरिक आयुर्वेदिक दृष्टिकोनातून तिचा वातदोषाशी संबंध जोडला जातो. थकवा आणि झोपेचा अभाव यांचाही तिच्याशी संबंध असू शकतो.

Ayurvedic Meaning

|

sakal

सतत जांभई येत असेल तर?

पुरेशी झोप घ्या, विश्रांती घ्या आणि झोपेचं नियमित वेळापत्रक पाळा. विनाकारण वारंवार जांभई येत असेल किंवा त्यासोबत इतर त्रास जाणवत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Constant Yawning

|

sakal

डायबिटीज कंट्रोलसाठी बदला रात्रीचं रुटीन ! आहारापासून झोपेपर्यंत पाळा ‘हे’ 7 नियम

Blood Sugar

|

Sakal

आणखी वाचा