समुद्राचं पाणी खारट का असतं?

Pranali Kodre

Why Is Sea Water Salty?

समुद्राचं पाणी खारट असतं हे सर्वांनाच माहित आहे, पण ते खारट असण्यामागं वैज्ञानिक कारणंही आहेत.

Why Is Sea Water Salty?

|

Sakal

पावसाचं पाणी

पावसाचे पाणी जेव्हा आकाशातून खाली येत असतं, त्यावेळी त्यात हवेतील कार्बन डायऑक्साईड मिसळतं आणि ते पाणी थोडं आल्मयुक्त (Acidic) बनतं.

Why Is Sea Water Salty?

|

Sakal

खडकांमधील क्षार

हे पावसाचं पाणी जेव्हा पर्वत आणि खडकांवर पडतं, तेव्हा त्यातील सोडियम आणि क्लोराईड यांसारख्या खनिजे आणि क्षार विरघळवून स्वत:सोबत वाहून नेते.

Why Is Sea Water Salty?

|

Sakal

नद्यांचा प्रवास

ओढे - नद्या या क्षारांना वाहून आणतात आणि शेवटी समुद्राला मिळतात. जरी नद्यांचे पाणी गोड वाटत असलं, तरी त्यात थोड्या प्रमाणात क्षार असतात. नद्या वर्षानुवर्षे हा क्षारयुक्त साठा समुद्रात टाकत आहेत.

Why Is Sea Water Salty?

|

Sakal

बाष्पीभवन

सुर्याच्या उष्णतेचे समुद्राच्या केवळ पाण्याची वाफ होऊन ढग बनतात, पण बाष्पीभवन होताना पाण्यातील क्षार आणि मीठ समुद्रातच राहते.

Why Is Sea Water Salty?

|

Sakal

Water Cycle

ह जलचक्राची (Water Cycle) क्रिया अब्जावधी वर्षांपासून सुरू आहे, ज्यामुळे समुद्रातील क्षारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि त्यामुळे पाणी अत्यंत खारट झाले आहे.

Why Is Sea Water Salty?

|

Sakal

तळातील ज्वालामुखी अन् उष्ण झरे

याशिवाय समुद्राच्या तळाची असलेल्या ज्वालामुखींच्या उद्रेकातूनही अनेक खनिजे आणि रसायने पाण्यात मिसळतात. समुद्राच्या तळातील उष्ण पाण्याच्या झऱ्यांमधूनही पृथ्वीच्या गर्भातील क्षार पाण्यात विरघळतात.

Why Is Sea Water Salty?

|

Sakal

मीठ

समुद्राच्या पाण्यात विरघळलेल्या क्षारांमध्ये सर्वाधिक म्हणजे साधारण ८५ टक्के भाग सोडियम आणि क्लोराईड असतो, ज्यापासून खाण्याचे मीठ बनते.

Why Is Sea Water Salty?

|

Sakal

नदीचं पाणी गोड का?

नद्यांचं पाणी गोड लागण्याचं कारण असं की त्यात क्षारांचे प्रमाण कमी असते आणि नद्या वाहत असतात.

Why Is Sea Water Salty?

|

Sakal

बंदिस्त मार्ग

पण समुद्रातील पाणी केवळ बाहेर जाण्यासाठी केवळ बाष्पीभवन हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे क्षार साचून राहतात आणि त्याचे पाणी खारट लागते.

Why Is Sea Water Salty?

|

Sakal

हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्ट, यात नेमका फरक काय?

Heart Attack vs Cardiac Arrest

|

Sakal

येथे क्लिक करा