महिला की पुरुष? मधुमेहाचा परिणाम कोणावर कसा होतो?

Aarti Badade

महिला-पुरुषांवर वेगळा परिणाम!

नवीन अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. टाईप-2 मधुमेह झाल्यानंतर महिला आणि पुरुषांमध्ये आरोग्याच्या समस्या वेगवेगळ्या पद्धतीने वाढू शकतात.

Diabetes

|

Sakal

महिलांना कोणता धोका?

मधुमेहाचे निदान झाल्यानंतर महिलांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचा धोका अधिक असल्याचे अभ्यासात दिसून आले. महिलांमध्ये हा धोका 8.1%, तर पुरुषांमध्ये 5.3% होता.

Diabetes

|

Sakal

पुरुषांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त

अभ्यासानुसार, मधुमेह असलेल्या पुरुषांमध्ये हृदयविकाराचा धोका महिलांच्या तुलनेत अधिक आढळला. पुरुषांमध्ये हे प्रमाण 8.4%, तर महिलांमध्ये 5.3% होते.

Diabetes

|

Sakal

किडनी आणि रक्तदाबाकडे लक्ष द्या

मधुमेहानंतर पुरुषांमध्ये किडनीशी संबंधित गंभीर आजार आणि उच्च रक्तदाबाचा धोका महिलांच्या तुलनेत जास्त असल्याचे संशोधनातून समोर आले.

Diabetes

|

Sakal

नेमका किती मोठा अभ्यास?

ब्रिटनमधील क्वीन मॅरी युनिव्हर्सिटी आणि इतर संशोधकांनी हा अभ्यास केला. यासाठी 2010 ते 2020 दरम्यान टाईप-2 मधुमेहाचे निदान झालेल्या सुमारे 28,720 महिला आणि पुरुषांच्या आरोग्य नोंदींचे विश्लेषण करण्यात आले.

Diabetes

|

Sakal

39% रुग्णांना गंभीर आजार

अभ्यासातील महत्त्वाची बाब म्हणजे, मधुमेहाचे निदान झाल्यानंतर सुमारे 39% रुग्णांना किमान एका गंभीर आजाराचा सामना करावा लागला. मात्र, या आजारांची तीव्रता आणि वेळ महिला-पुरुषांमध्ये वेगवेगळी होती.

Diabetes

|

Sakal

महिलांमध्ये मानसिक, पुरुषांमध्ये हृदय-किडनी

संशोधनातून एक महत्त्वाचा फरक समोर आला. महिलांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे, तर पुरुषांमध्ये हृदय, किडनी आणि रक्तदाबाशी संबंधित समस्यांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे निष्कर्ष दिसून आले.

Diabetes

|

Sakal

चेहऱ्यावर हवा ग्लो? घरच्या घरी बनवा हा फेस मास्क

skin face mask 

|

Sakal

येथे क्लिक करा