सूरज यादव
जगतील सर्वात थंड आणि बर्फाने झाकलेला ग्रीनलँड सध्या जगातला सर्वात गरम असा राजकीय विषय ठरलाय. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर नियंत्रणाचा पुनरुच्चार केलाय.
Why Does Donald Trump Want Greenland
ESakal
ट्रम्प यांनी याआधीही ग्रीनलँड खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता त्यांनी ग्रीनलँड अमेरिकेच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचं म्हटलंय.
Why Does Donald Trump Want Greenland
ESakal
ट्रम्प यांच्या विधानाने अमेरिका आणि डेन्मार्क यांच्यात तणाव वाढला आहे. ग्रीनलँडवर डेन्मार्कची मालकी आहे.
Why Does Donald Trump Want Greenland
ESakal
ग्रीनलँड जगातलं सर्वात मोठं बेट आहे. २२ लाख किमी वर्ग क्षेत्रात पसरलेला हा भाग जर्मनीपेक्षा सहा पट मोठा आहे. तरीही इथं फक्त ५६ हजार लोक राहतात.
Why Does Donald Trump Want Greenland
ESakal
उत्तर अमेरिका आणि आर्कटिक यांच्या मधे असलेला ग्रीनलँड सुरक्षेसाठी महत्त्वाचा आहे. इथल्या पिटुफिक स्पेस बेसवर अमेरिकेचे लष्करी तळ आहे.
Why Does Donald Trump Want Greenland
ESakal
आर्कटिक क्षेत्रात अमेरिकेशिवाय रशिया आणि चीनही त्यांची ताकद वाढवतायत. समुद्री वाहतूक, मार्ग, तिथं मिळणारे खनिज यामुळे ग्रीनलँड युद्धभूमी बनलेय.
Why Does Donald Trump Want Greenland
ESakal
अमेरिका मागे हटल्यास रशिया किंवा चीन ग्रीनलँडवर ताबा मिळवू शकतात असं ट्रम्प यांना वाटतं. त्यामुळेच ते ग्रीनलँड घेण्यासाठी प्रयत्न करतायत.
Why Does Donald Trump Want Greenland
ESakal
ग्रीनलँडचा ८० टक्के भाग बर्फाने झाकलेला आहे. तर जमिनीच्या खाली युरेनियम, लोह आणि इतर धातूंचं उत्खननही मोठ्या प्रमाणावर होत आहे. तेल आणि गॅस असण्याचीही शक्यता व्यक्त केली जातेय.
Why Does Donald Trump Want Greenland
ESakal
ग्रीनलँडची अर्थव्यवस्था सध्या मत्स्य व्यवसायावर अवलंबून आहे. याशिवाय डेन्मार्ककडून मिळणारी आर्थिक मदत त्यांचा कणा आहे.
Why Does Donald Trump Want Greenland
ESakal
Gun Invention history
ESakal