गरम पाणी ओतल्यावर काचेचा ग्लास का फुटतो? वैज्ञानिक कारण जाणून घ्या

Mansi Khambe

थर्मल शॉक

तुम्ही कधी ना कधी पाहिले असेल की, गरम पाणी ओतताच काचेच्या ग्लासला तडा जातो किंवा तो फुटतो. पण कधी प्रश्न पडला आहे का की असे का होते? खरं तर, यामागे वैज्ञानिक कारण आहे, ज्याला 'थर्मल शॉक' म्हणतात.

काच

काच हा एक असा पदार्थ आहे जो तापमानातील अचानक बदल नेहमीच सहन करू शकत नाही. जेव्हा तुम्ही थंड किंवा सामान्य तापमानाच्या ग्लासात खूप गरम पाणी ओतता, तेव्हा ग्लासाच्या आतील भाग वेगाने गरम होतो.

तापमान

ग्लासाच्या आतील आणि बाहेरील भागाचे तापमान वेगवेगळे होते. यामुळे काचेवर दाब निर्माण होतो. हा दाब काचेच्या सहन करण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त होतो, ज्यामुळे तिला तडा जातो आणि ती फुटूते.

थर्मल शॉक

जेव्हा एखाद्या वस्तूचे तापमान अचानक आणि मोठ्या प्रमाणात बदलते, तेव्हा त्याला थर्मल शॉक म्हणतात.

काचेचा प्रकार

मात्र प्रत्येक ग्लासवर गरम पाणी ओतल्यावर तो फुटत नाही. हे काचेच्या प्रकारावर आणि ती किती उष्णता सहन करू शकते यावर अवलंबून असते.

तापमानातील बदल

सामान्य काचेच्या ग्लास तापमानातील अचानक बदलांमुळे सहज तडा जाऊ शकतो.

बोरोसिलिकेट काच

याउलट, बोरोसिलिकेट काच सामान्य काचेपेक्षा तापमानातील अचानक बदल चांगल्या प्रकारे सहन करण्यासाठी बनवलेली असते. म्हणूनच तिचा वापर प्रयोगशाळेत करतात.

नथीचा जन्म भारतात झालाच नव्हता? हजारो वर्षांचा इतिहास जाणून तुम्हीही थक्क व्हाल!

Nath History and Origin

|

sakal

येथे क्लिक करा