Aarti Badade
ड्रॅगन फ्रूट पावसाळ्यात खाणे खूप फायदेशीर असते.
ड्रॅगन फ्रूटमधील व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स मुळे पावसाळ्यात होणारे सर्दी-खोकला व इतर आजार टाळण्यास मदत होते.
ड्रॅगन फ्रूटमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीरात पाण्याची कमतरता होऊ देत नाही.
फायबरयुक्त असल्यामुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
ड्रॅगन फ्रूटमध्ये नैसर्गिक साखर असून ते चवदार आणि आरोग्यदायी आहे.
लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांसारखी आवश्यक पोषकद्रव्ये यात भरपूर असतात.
सकाळी नाश्त्यात,जेवणाच्या मधल्या वेळेत,रात्री झोपण्यापूर्वी या योग्य वेळा आहेत.
कापून सरळ खा किंवा स्मूदी, सॅलड किंवा दह्यासोबत मिसळून खा
पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती टिकवण्यासाठी ड्रॅगन फ्रूट एक उत्तम निवड आहे.
स्वच्छ करूनच खावे, कारण पावसाळ्यात बुरशीजन्य संसर्गाची शक्यता अधिक असते.