मीठाशिवाय फळं आणि सॅलड खाल्ल जात नाही? मग याचे किडनीवर होणारे परिणाम नक्की वाचा

Anushka Tapshalkar

सॅलड-फळांवर मीठ टाकणं धोकादायक ठरू शकतं
चव वाढवण्यासाठी सॅलड किंवा फळांवर मीठ टाकण्याची सवय किडनीच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

Salt | sakal

अतिमीठामुळे सोडियमची पातळी वाढते
जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील सोडियम झपाट्याने वाढते आणि किडनी व हृदयावर ताण येतो.

sakal

दररोज किती सोडियम योग्य?
दिवसाला १,५०० मिलीग्रामपेक्षा जास्त सोडियमचे सेवन केल्यास किडनीला हानी पोहोचू शकते.

sakal

शरीरात पाणी साचण्याचा धोका
अतिमीठामुळे शरीरात पाणी धरून राहते, त्यामुळे सूज, पोट फुगणे आणि अस्वस्थता वाढते.

sakal

डिहायड्रेशनची शक्यता वाढते
जास्त सोडियममुळे शरीरातील द्रवपदार्थांचे संतुलन बिघडते आणि पाण्याची कमतरता जाणवते.

Dehydration | Sakal

कोरडं तोंड आणि सतत तहान लागणं
मीठ जास्त झाल्यास तोंड कोरडं पडणं, वारंवार पाणी पिण्याची इच्छा होणं अशी लक्षणे दिसतात.

Dry Mouth

|

sakal

किडनीच्या कार्यावर थेट परिणाम
अतिमीठामुळे वारंवार लघवी लागते आणि रक्त शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात.

kidney 

|

sakal

आरोग्याचा शत्रू ठरू शकतात 'हे' रोजचे पदार्थ; थायरॉईड रुग्णांनी तर दोन हात लांबच रहा

thyroid | Sakal
आणखी वाचा