सूरज यादव
फिफा वर्ल्ड कप स्पर्धेला ११ जूनपासून सुरुवात होतेय. फिफाचा पहिला वर्ल्ड कप १९३० मध्ये झाला होता.
First FIFA World Cup
Esakal
पहिल्या फिफा वर्ल्ड कपचं आयोजन उरुग्वेत करण्यात आलं होतं. त्यासाठी उरुग्वेनं स्पेशल स्टेडियम उभारलं.
First FIFA World Cup
Esakal
उरुग्वेनं फिफाच्या स्थापनेनंतर सलग दोनदा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकलं होतं. तर फिफाचा १९३० चा आणि १९५० चा वर्ल्ड कप जिंकला.
First FIFA World Cup
Esakal
ऑलिम्पकची दोन पदके आणि दोन वर्ल्ड कप जिंकलेल्या उरुग्वेला चार वर्ल्ड कप जिंकले असं मानण्यासाठी फिफाने विशेष परवानगी दिलीय.
First FIFA World Cup
Esakal
युरोपातून उरुग्वेला बोटीने २० ते २५ दिवसांचा प्रवास करून जावं लागत होतं. तेव्हा फ्रान्स, बेल्जियम, रुमानिया आणि ब्राझीलचे संघ एकाच बोटीने गेले.
First FIFA World Cup
Esakal
इजिप्तच्या संघाने दुसऱ्या जहाजाची तिकिटं काढली होती. पण भूमध्य समुद्रात आलेल्या वादळामुळे ते एक दिवस उशिरा बंदरात पोहोचले.
First FIFA World Cup
Esakal
परिणामी ज्या जहाजाने उरुग्वेला जायचं होतं ते जहाज निघून गेलं होतं. यामुळे इजिप्तचा पहिला फिफा वर्ल्ड कप न खेळताच गेला.
First FIFA World Cup
Esakal
पहिल्या फिफा वर्ल्ड कपमध्ये ७ दक्षिण अमेरिकेचे, दोन उत्तर अमेरिकेचे आणि चार युरोपातील देश असे १३ देश पात्रता फेरीशिवाय सहभागी झाले होते.
First FIFA World Cup
Esakal
El Nino and la nina
Esakal