पावसाळ्यात लाईट का जाते? मधल्या काळात नेमकं काय घडतं?

Vinod Dengale

पाऊस आणि वीज

पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना वाढतात.

वीज का जाते?

वादळी वारे, विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस, झाडांच्या फांद्या तुटणे, इन्सुलेटर खराब होणे किंवा तारा तुटणे यामुळे वीजपुरवठा बंद होऊ शकतो.

वीज गेल्यावर काय होत?

वीज गेल्यानंतर उपकेंद्रातील कर्मचारी शेजारच्या उपकेंद्रांशी संपर्क साधून पुरवठ्याची स्थिती तपासतात आणि संबंधित फीडर पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करतात.

'फीडर ट्रिप' म्हणजे काय?

फीडर सुरू केल्यानंतर तो पुन्हा बंद झाला तर त्याला 'फीडर ट्रिप' म्हणतात. याचा अर्थ कुठेतरी गंभीर बिघाड झालेला असतो.

शोधमोहीम

फीडर ट्रिप झाल्यानंतर कर्मचारी पाऊस, अंधार आणि वादळाची पर्वा न करता खांबागणिक तपासणी करत बिघाडाचा शोध घेतात.

म्हणूनच वेळ लागतो!

बिघाड शोधणे, सुरक्षितता तपासणे आणि दुरुस्ती करणे ही प्रक्रिया अनेकदा वेळखाऊ आणि अत्यंत जोखमीची असते.

तक्रार कशी कराल?

लाईट गेल्यास 1912 किंवा 1800-212-3435 किंवा 1800-233-3435 या टोल फ्री नंबरवर तक्रार नोंदवू शकतात.

विश्वास बसणार नाही! मेळघाटातून उडालेला पक्षाचा 27 दिवसांत 3,334 किमीचा प्रवास, कुठे गेला?

This Tiny Bird Flew 3,334 KM in Just 27 Days!

|

eSakal

हेही वाचा