संतोष कानडे
फ्रान्समधील 'युनिव्हर्सिटी ऑफ माँटपेलियर'च्या संशोधकांनी २००० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मुलांच्या डेटाचा अभ्यास करून एक निष्कर्ष काढला आहे.
संशोधनानुसार, महिला खेळाडू त्यांच्या सक्रिय क्रीडा करिअरदरम्यान गरोदर राहिल्यास मुलगी होण्याची शक्यता ६३ टक्क्यांपर्यंत वाढते.
तसेच मॅरेथॉन, सायकलिंग आणि ट्रायथलॉनसारखे जास्त स्टॅमिना लागणारे खेळ खेळणाऱ्या ॲथलीट्सना मुलगी होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आढळले आहे.
कठीण आणि सततच्या व्यायामामुळे खेळाडूंच्या शरीरावर प्रचंड शारीरिक ताण निर्माण होतो, जो लिंग निश्चितीवर परिणाम करतो.
अतिव्यायामामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते; निसर्गाच्या नियमानुसार अशा कठीण परिस्थितीत मानवी प्रजाती टिकवण्यासाठी 'मुलगी' जन्माला येण्याची शक्यता वाढते.
उच्च तीव्रतेच्या ट्रेनिंगमुळे खेळाडूंच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन आणि कोर्टिसोल सारख्या संप्रेरकांमध्ये मोठे बदल होतात.
पुरुषांमध्ये, मुलगा होण्यासाठी कारणीभूत असलेले 'Y' गुणसूत्राचे शुक्राणू नाजूक असतात आणि शारीरिक ताणामुळे ते लवकर नष्ट होऊ शकतात.
याउलट, मुलगी होण्यासाठी कारणीभूत असलेले 'X' गुणसूत्राचे शुक्राणू जास्त मजबूत असतात आणि ते प्रतिकूल शारीरिक परिस्थितीतही दीर्घकाळ जिवंत राहतात.
हे संशोधन केवळ 'शक्यता' वाढते हे सांगते, याचा अर्थ खेळाडूंना मुलगा होऊच शकत नाही असा अजिबात नाही. अनेक क्रिकेटर्सना आणि इतर खेळाडूंना मुलं आहेत.