पापण्या का फडफडतात माहित आहे का? शुभ-अशुभ संकेत नाही

अंकिता खाणे (Ankita Khane)

डोळे हा आपल्या प्रमुख इंद्रियांपैकी एक आहे. तसेच नाजूक अवयव देखील आहे. त्यामुळे डोळ्यांची आरोग्य राखणे, निगा ठेवणे महत्त्वाचे असते.

दरम्यान बऱ्याचदा आपल्यापैकी अनेकांना पापणी फडफडण्याचा अनुभव आला असेल. अनेकदा डोळे फडफडणे हे शुभ किंवा अशुभ संकेत असल्याचे आपल्या कुटुंबातील कोणीतरी सांगितलंही असेल.

पण खरंतर पापणी फडफडण्यामागे शुभ किंवा अशुभ संकेत नाही, तर शास्त्रीय कारण आहे.

डोळे हा नाजूक भाग असतो, त्यामुळे त्याच्या कार्यात छोटी जरी समस्या झाली, तरी ती आपल्याला जाणवते. पापणी फडफडण्यामागचेही असेच कारण आहे.

डोळ्यांच्या मागील मासपेंशीमध्ये काही समस्या झाल्यास, स्नायुंचे आकुंचन झाल्यास पापणी फडफडते. बऱ्याचदा असे काही साध्या कारणांमुळे होते.

बऱ्याचदा झोप कमी होणे, ताण, डोळ्यांमधील खाज अशा कारणांमुळे पापण्यांची फडफड होऊ शकते.

तज्ञांच्या माहितीनुसार डोळ्यांची फडफड ही साधारणत: काही सेकंद किंवा काही मिनिटांसाठी किंवा तासाभरासाठी होऊ शकते.

तसेच ही फडफड वेदनारहित, निरुपद्रवी असते. त्यामुळे फार त्रास होत नाही.

परंतु, जर डोळ्यांची फडफड सातत्याने होत असेल आणि अनेक दिवस होत असेल, तर मात्र वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते.

हे डोळ्यांच्या आजारामागील कारणही असू शकते. अशावेळी वैद्यकिय मदत घेणेच योग्य ठरू शकते.

पापणी फडफडण्याची सामान्य कारणे

थकवा, झोपेची कमी, अतिरिक्त व्यायम, कॅफेनचे अतिरिक्त सेवन

वैद्यकिय उपचारांची मदत लागू शकेल अशी पापणी फडफडण्याची कारणे

डोळ्यांची खाज, डोळे कोरडेपडणे, प्रदुषणामुळे येणारी खाज, अल्कोहोलचे अतिप्रमाण, धुम्रपान, डोळ्यांची सुज/जळजळ, औषधे

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

वारंवार उकळ्याने चहाचं होऊ शकतं विष; हिवाळ्यात घ्या विशेष काळजी

tea