Saisimran Ghashi
फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना, व्हेलेटाईन डे अस म्हटलं जात.
पण फेब्रुवारी महिन्यात २८ दिवस का असतात असा विचार केला आहे का?
रोमन कॅलेंडरमध्ये सुरुवातीला १० महिने होते, ज्यात वर्ष ३०४ दिवसांचे होते.
इ.स.पू. ७१३ मध्ये, राजा नुमा पॉम्पिलियसने दोन महिने, जानेवारी आणि फेब्रुवारी, जोडले, ज्यामुळे वर्ष ३५५ दिवसांचे झाले.
रोमन लोक समजत होते की सम संख्या अशुभ असतात, त्यामुळे त्यांनी महिन्यांची दिवससंख्या विषम ठेवली.
वर्षाचे दिवस ३५५ असल्याने, काही महिन्यांना सम संख्या दिवस देणे आवश्यक होते.
फेब्रुवारी वर्षाच्या शेवटी असायचा आणि त्याला २८ दिवस देण्यात आले.
ज्युलियस सीझरने इ.स.पू. ४६ मध्ये ज्युलियन कॅलेंडरची ओळख करून दिली, ज्यामुळे वर्ष ३६५ दिवसांचे झाले.
ज्युलियन कॅलेंडरमध्ये, फेब्रुवारीला २८ दिवस ठेवण्यात आले आणि प्रत्येक चौथ्या वर्षी एक अतिरिक्त दिवस जोडला गेला, ज्याला लीप वर्ष म्हणतात.
ग्रीगोरियन कॅलेंडरमध्येही हीच रचना कायम ठेवली गेली, ज्यामुळे फेब्रुवारीला २८ दिवस आणि लीप वर्षात २९ दिवस असतात.