विनयन वाघमारे
एकाच वेळी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट निर्माण झाले आहे, तर दुसरीकडे अरबी समुद्रातही कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले आहे.
Weather
Sakal
दोन्ही बाजूंनी बाष्पयुक्त आणि वेगवान वारे जमिनीकडे वाहत असल्यामुळे देशाच्या अनेक भागांत अचानक ढगाळ वातावरण तयार झाले आहे.
Weather
Sakal
या वादळी प्रणालीची तीव्रता पुढील काही तासांत अधिक वाढणार असून पुढचे ७ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे.
Weather
Sakal
अरबी समुद्रातील हालचालींमुळे कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
Weather
Sakal
बाजारपेठांमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होत असतानाच अवकाळी पावसाच्या इशाऱ्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.
Weather
Sakal
समुद्र खवळलेला राहणार असून वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किमीवर जाण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Weather
Sakal
दिवाळीची खरेदी किंवा प्रवासाचे नियोजन करताना हवामानाचा ताजा अंदाज तपासूनच बाहेर पडा आणि वादळी वाऱ्यावेळी सुरक्षित ठिकाणी थांबा.
Weather
Sakal
Submarine
Sakal