Shubham Banubakode
इराण-इस्त्रायल युद्धामुळे मध्यपूर्वेत तणाव निर्माण झाला आहे. या युद्धामुळे एलपीजी पुरवठा खंडीत झाला आहे.
देशभरात सिलिंडरची टंचाई निर्माण झाली असून घरगुती सिलिंडर येण्याचा विलंब होतो आहे.
पण आपल्याकडे येणारं गॅस सिलिंडर गोलच का असतं? असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का?
सिलिंडर गोल असण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. गॅस हा सर्व दिशांना समान दाब टाकतो. गोल आकारामुळे हा दाब सर्व बाजूंनी समान पसरतो.
जर सिलेंडर चौकोनी असतं तर कोपऱ्यांवर दबाव वाढून सिलिंडरला तडे जाण्याची किंवा स्फोटाची शक्यता वाढली असती.
गोल आकारामुळे धक्का बसल्यावर दबाव सहज पसरतो, त्यामुळे सिलेंडर फुटण्याचा धोका कमी होतो.
गॅस सिलिंडर स्टील किंवा फायबरग्लासपासून बनवले जातात. जे हलके आणि सुरक्षित असतात.
Ultramarine Blue Price
esakal