सकाळ डिजिटल टीम
जे लोक हिंदू धर्मावर विश्वास ठेवतात, ते घरी बनवलेली पहिली भाकरी गायीसाठी ठेवतात आणि पहिली भाकरी गायीला खाऊ घालणे खूप शुभ मानतात.
पहिली भाकरी गायीला खायला दिल्यास काय होते हे तुम्हाला माहीत आहे का? असे केल्याने तुम्हाला जीवनात कोणते फायदे मिळतात?
हिंदू धर्मात गायीला मातेचा दर्जा देण्यात आला असून, गाय ही पूजनीय मानली जाते.
मान्यतेनुसार, गायींमध्ये देवी-देवता वास करतात असं मानलं जातं. अशा स्थितीत सकाळी तयार केलेली पहिली भाकरी गायीला खाऊ घातल्यास अनेक शुभ कामं होतात.
गायीला भाकरी खाऊ घातल्याने घरातील गरिबी दूर होते आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते. कौटुंबिक जीवनात सुख, शांती आणि समृद्धीही पाहायला मिळते.
असे मानले जाते की, पहिली भाकरी गायीला खायला दिल्यास तुमच्या कुंडलीतील अशुभ ग्रहही तुमचे काही नुकसान करू शकत नाहीत. उलट हे ग्रहही तुम्हाला चांगले परिणाम देऊ लागतात.
पहिली भाकरी गायीला खाऊ घातल्याने देवी-देवता प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतात.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.