पावसाळ्यात 'या' झाडांच्या जवळ जाणं ठरू शकतं धोकादायक!

Pranali Kodre

पावसाळा (Rain)

पावसाळ्यात निसर्ग सुंदर दिसतो, हिरवागार दिसते, पण तरी काही झाडांच्या जवळ जाणे किंवा त्याखाली उभे राहणे धोक्याचे ठरू शकते. यामागे अनेक कारणं असू शकतात.

Dangerous Trees in Monsoon

|

Sakal

वाळलेली किंवा पोकळ झाडं

काही जुनी झाडं हिरवीगार दिसत असली, तरी ती आतून पोकळ असू शकतात. त्यामुळे पावसामुळे अशा झाडांच्या खोडात पाणी भरते. नंतर सोसाट्याचा वाराही असल्यास अशी झाडं कोसळू शकतात. (Hollow or Dry Trees)

Dangerous Trees in Monsoon

|

Sakal

क्राँक्रिट किंवा पेव्हर ब्लॉकमधील झाडं

सिमेंट किंवा पेव्हर ब्लॉकमधील झाडांपर्यंत पुरेसं पाणी आणि हवा पोहचत नसल्याने त्यांची मुळं कमकुवत होतात. त्यामुळे अशी झाडं पडण्याचा धोका असतो. (Concretized Trees)

Dangerous Trees in Monsoon

|

Sakal

उंच झाडं

उंच झाडं वीज कडाडट असताना अत्यंत धोकादायक असतात, कारण अशी झाडं 'नॅचरल लायटनिंग कंडक्टर' (Natural Lightning Conductor) असतात. (Tall Trees)

Dangerous Trees in Monsoon

|

Sakal

ठिसूळ लाकूड

काही झाडांचे लाकूड ठिसूळ आणि मऊ असते, जसे की शेवगा, गुलमोहर. अशा झाडांच्या फांद्या अचानक तुटू शकतात. (Brittle Wood Trees)

Dangerous Trees in Monsoon

|

Sakal

निलगिरी (Nilgiri)

निलगिरीची झाडं खूप उंच वाढली, तरी त्याची मुळं जमिनीत फार खोल गेलेली नसतात. त्यामुळे पावसाळ्यात अशी झाडं सहज उन्मळून पडू शकतात. (Eucalyptus Tree)

Dangerous Trees in Monsoon

|

Sakal

विषारी झाडं

जंगलात किंवा शेताच्या कडेला पावसाळ्यात अनेक रानटी झाडं किंवा गवत उगवते. यातील काही गवतं किंवा झाडं विषारी असू शकतात. त्यामुळे त्वचेची आग किंवा खास सुटण्याचा त्रास होऊ शकतो.

Dangerous Trees in Monsoon

|

Sakal

नदी नाल्यांच्याकडील झाडं

नदी किंवा नाल्यांच्या कडेला असलेल्या झाडांच्या भोवतालची माती पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे वाहून जाते, त्यामुळे झाडं कोसळू शकतात.

Dangerous Trees in Monsoon

|

Sakal

एकाच बाजूला झुकलेले झाड

एकाच बाजूला झुकलेले झाडंही पावसाळ्यात धोकादायक ठरू शकते. (Leaning Trees)

Dangerous Trees in Monsoon

|

Sakal

महत्त्वाचे

शक्य असल्यास पावसाळ्यात झाडाचा फार आडोसा घेऊ नका, विशेषत: वीज कडाडट असेल, तर. तसेच तुटलेल्या फांद्यांकडे लक्ष द्या. जोरदार वाऱ्यात मोठ्या झाडांपासून लांब राहा.

Dangerous Trees in Monsoon

|

Sakal

घरच्या घरी लिंबाचं झाड कसं वाढवाल? सोप्या टिप्स

How to Grow Lemon Tree at Home

|

Sakal

येथे क्लिक करा