Shubham Banubakode
मॉरिशस हा हिंदी महासागरातील एक देश (बेट)
या देशाची लोकसंख्या जवळपास १२ लाख
विशेष म्हणजे निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या देशात मराठी भाषिक लोक मोठ्या प्रमाणात दिसून येतात.
पण महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर इतके मराठी भाषिक लोक कसे? तुम्हाला माहिती का?
खरं सांगायचं तर १५९८ पर्यंत या ठिकाणीही कोणतीही मनुष्यवस्ती नव्हती.
पुढे डच आणि फ्रेंच यांनी या ठिकाणी वसाहत स्थापन करण्याचा प्रयत्न केला.
यात फ्रेंचांना यश मिळालं, पण या ठिकाणी वसाहत स्थापन करताच, फ्रेंचांनी ब्रिटीशांच्या नाविक स्थळांवर हल्ले सुरू केले.
या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इंग्रजांनी मॉरिशसवर हल्ला केला. यावेळी ब्रिटिशांच्या सैन्यात ९००० भारतीय सैनिक होते.
ब्रिटिशांच्या नेतृत्वात मॉरिशस हे मळ्याच्या शेतीचे व साखरनिर्मितीचे प्रमुख केंद्र बनलं.
पुढे ब्रिटिशांनी शेतीच्या कामासाठी भारतातून मजूर आणण्यास सुरुवात केली.
१८४२ रोजी मुंबईहून १७३ जणांचं मराठी स्थलांतरितांचं पहिलं जहाज मॉरिशसला पोहोचलं.
यात १७३ पैकी १०० जण रत्नागिरी, मालवण, ठाणे, सातारा, पश्चिम महाराष्ट्र या भागातील होते.
मॉरिशनमधील पर्वतीय प्रदेश आणि समुद्रकिनारे यामुळे या मराठीजनांना हा प्रदेश आपलासा वाटू लागला.
त्यामुळे हे त्यांनी इथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
तेव्हापासून आजपर्यंत मॉरिशसमधील अनेक पिढ्यांनी त्याचं मराठीपण जपून ठेवलं आहे.