Apurva Kulkarni
लग्न हे शारिरीक आणि भावनिक रित्या एकमेकांना जवळ आणत असतात. परंतु तुलग्नानंतर नवरा बायको एकसारखे का दिसतात? तर जाणून घेऊया...
एका रिसर्चनुसार लग्नाच्या काही वर्षानंतर जोडपं एकसारखं दिसू लागतं. शरीर रचनेत सुद्धा कधी कधी साम्य दिसतं
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉमेशन म्हणजेच एनसीबीआयच्या संशोधनानुसार लग्नाच्या काही वर्षानंतर जोडपे एकसारखे दिसतात.
यामागणं पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे भावनिक रित्या जोडलं जाणं. अनेक दिवस एकत्र राहिल्यानंतर नवरा-बायको एकमेकांना समजून घेऊन लागतात. प्रत्येक गोष्टीचा ते स्वीकार करतात.
दुसरं कारण म्हणजे प्रत्येक जोडपं लग्नाच्या काही वर्षानंतर एकमेकांचं अनुकरण करत असतात. एकमेकांच्या सवयी हावभावाचे अनुकरण करत असतात.
अनेक दिवस सोबत राहिल्यानंतर दोघांच्याही सवयीमध्ये साम्य येतं. दोघांच्या जीवनशैलीतही समानता दिसून येते.
अनेक दिवस एकत्र राहिल्यानंतर विचार सुद्धा जुळू लागतात. आवडी-निवडी एकमेकांच्या समजून घेतल्याने त्या एकमेकांमध्ये आत्मसाद होतात.
एकसारख्या आरोग्य सवयी असल्यामुळे अनेक वेळा जोडपं एकसारखं दिसू लागतं. एकत्र व्यायाम केल्याने शरिरात सुद्धा समान बदल दिसून लागतात.