Anushka Tapshalkar
सध्या भारतात इराण-इस्रायल युद्धाचे परिणाम अनुभवायला मिळत आहेत. त्यामुळे गॅस टंचाई झाली असून बहुतेकजण इंडक्शन वापरत आहेत. मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, की याचा आकार चौकोनीच का असतो? तर लगेच जाणून घेऊया.
इंडक्शनमध्ये कॉपर कॉइल, सर्किट बोर्ड आणि कूलिंग फॅन बसवण्यासाठी चौकोनी आकार सर्वात सोयीचा ठरतो. गोल आकारात हे घटक व्यवस्थित बसवणं कठीण आहे.
Why Induction Cooktops are Square
sakal
दीर्घकाळ वापरल्यास इंडक्शन गरम होतो. चौकोनी आकारामुळे फॅनला पुरेशी जागा मिळते आणि ओव्हरहीट होण्याची शक्यता कमी होते.
चौकोनी पृष्ठभागावर मोठे भांडे ठेवताना ते सरकण्याची भीती कमी असते. गोल इंडक्शनवर भांडे एका बाजूला झुकू शकते.
sakal
काचेची शीट चौकोनी आकारात सोप्या प्रकारे कापता येते. गोल आकार कापताना जास्त काच वाया जाते, त्यामुळे खर्च वाढतो.
टच बटणं, डिस्प्ले आणि कंट्रोल पॅनल व्यवस्थित बसवण्यासाठी चौकोनी डिझाइन उत्तम ठरते.
Why Induction Cooktops are Square
sakal
चौकोनी बेसमुळे इंडक्शन काउंटर किंवा टेबलवर स्थिर राहतो. गोल आकार हलण्याची शक्यता जास्त असते.
Why Induction Cooktops are Square
sakal
ओट्यावर किंवा किचन टेबलवर चौकोनी इंडक्शन व्यवस्थित बसतो आणि कमी जागा व्यापतो.
Why Induction Cooktops are Square
sakal