ATM चा PIN नेहमी 4 अंकांचाच का असतो? जाणून घ्या यामागची रंजक कहाणी

Mansi Khambe

जॉन शेफर्ड-बॅरन

जगातील पहिले एटीएम स्कॉटलंडच्या जॉन शेफर्ड-बॅरन यांनी शोधले होते. ते २७ जून १९६७ रोजी लंडनच्या एनफिल्ड भागातील बार्कलेज बँकेच्या शाखेबाहेर बसवण्यात आले होते.

ATM 4 digits PIN

|

ESakal

व्हेंडिंग मशीन

असे म्हटले जाते की, चॉकलेट विकणारे एक व्हेंडिंग मशीन पाहिल्यानंतर शेफर्ड-बॅरन यांना ही कल्पना सुचली. एके दिवशी बँक बंद असल्यामुळे ते पैसे काढू शकले नाहीत.

ATM 4 digits PIN

|

ESakal

चॉकलेट

तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की, ज्याप्रमाणे एक मशीन चॉकलेट देते, त्याचप्रमाणे एक मशीन पैसेही देऊ शकते. जेव्हा शेफर्ड-बॅरन यांनी हे मशीन तयार केले.

ATM 4 digits PIN

|

ESakal

प्रणाली

तेव्हा त्यांना अशा एका प्रणालीची गरज होती, जी पैसे काढणाऱ्या खऱ्या ग्राहकाला ओळखू शकेल. हे साध्य करण्यासाठी, त्यांना वैयक्तिक ओळख क्रमांकाची कल्पना सुचली.

ATM 4 digits PIN

|

ESakal

सहा-अंकी पिन

शेफर्ड-बॅरन स्वतः सैन्यात होते, त्यामुळे अधिक सुरक्षिततेसाठी त्यांनी सुरुवातीला त्यांच्या लष्करी क्रमांकाप्रमाणे सहा-अंकी पिनचा विचार केला.

ATM 4 digits PIN

|

ESakal

हॅक

त्यांचा असा विश्वास होता की, पिनमध्ये जितके जास्त अंक असतील, तितका तो अधिक सुरक्षित असेल आणि त्यामुळे तो सहजपणे हॅक करणे कठीण होईल.

ATM 4 digits PIN

|

ESakal

कॅरोलिन

पण जेव्हा शेफर्ड-बॅरनने आपली पत्नी कॅरोलिनला आपला ६-अंकी पिन लक्षात ठेवायला लावला, तेव्हा त्यांना एका रंजक समस्येचा सामना करावा लागला.

ATM 4 digits PIN

|

ESakal

योजना

कॅरोलिनने त्यांना सांगितले की तिला फक्त ४ अंक सहज लक्षात राहतात. त्यापेक्षा जास्त अंक लक्षात ठेवणे तिला अवघड जाते. आपल्या पत्नीचा सल्ला गांभीर्याने घेऊन शेफर्ड-बॅरनने आपली संपूर्ण योजना बदलली.

ATM 4 digits PIN

|

ESakal

एटीएम मशीन

पिन ६ ऐवजी ४ अंकी केला. शेफर्ड-बॅरनच्या निर्णयाचा पुढे जगभरातील बँकिंग प्रणालींवर प्रभाव पडला. जगभरात एटीएम मशीनचा वापर वाढल्याने, ४-अंकी पिन सार्वत्रिकरित्या लोकप्रिय झाला.

ATM 4 digits PIN

|

ESakal

४-अंकी पिन

जरी ४-अंकी पिन लक्षात ठेवायला सोपा असला तरी, सुरक्षेच्या दृष्टीने तो तितकासा मजबूत मानला जात नाही. ४-अंकी पिनमध्ये ०००० ते ९९९९ पर्यंत फक्त १०,००० संभाव्य जोड्या असतात.

ATM 4 digits PIN

|

ESakal

प्राधान्य

जर पिन ६ अंकी असता, तर ही संख्या लाखोपर्यंत पोहोचली असती, ज्यामुळे तो हॅक करणे आणखी कठीण झाले असते. असे असूनही, बँका सोयीला प्राधान्य देतात.

ATM 4 digits PIN

|

ESakal

कार्ड ब्लॉक

कारण एटीएममध्ये चुकीचा पिन टाकण्यासाठी फक्त तीन संधी मिळतात, त्यानंतर कार्ड ब्लॉक केले जाते. यामुळेच ४-अंकी पिन असूनही तो सुरक्षित मानला जातो.

ATM 4 digits PIN

|

ESakal

आधुनिक

बँकिंग प्रणाली आधुनिक झाली असली आणि डिजिटल पेमेंटचे युग आले असले तरी एटीएम पिनबाबतची जुनीच परंपरा कायम आहे. देशानुसार बँकिंग नियम वेगवेगळे असले तरी बहुतेक ठिकाणी अजूनही ४-अंकी पिन वापरला जातो.

ATM 4 digits PIN

|

ESakal

रात्री जंगलातील झाडे एकमेकांशी कसे बोलतात? जाणून घ्या यामागचे वैज्ञानिक सत्य...

Tree Communication

|

ESakal

येथे क्लिक करा