सकाळीच बीपी का वाढतो? तज्ज्ञांनी सांगितलेली धक्कादायक कारणे

Aarti Badade

बीपी

अनेक लोकांना सकाळी उठल्याबरोबर उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवतो. हा त्रास हृदयविकाराला निमंत्रण देऊ शकतो, त्यामुळे वेळीच सावध होणे गरजेचे आहे.

Morning high blood pressure

|

Sakal

बीपी वाढण्याची मुख्य कारणे

सकाळी शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स वाढणे, अपुरी झोप, आहारात मिठाचा अतिवापर आणि झोपेतून अचानक उठणे ही याची प्रमुख कारणे आहेत.

Morning high blood pressure

|

Sakal

घाईघाईत उठणे टाळा

झोपेतून उठल्यावर लगेच बेडवरून उडी मारू नका. आधी कुशीवर वळा, मग सावकाश उठा आणि थोड्या वेळाने उभे राहा; यामुळे बीपी वेगाने वाढणार नाही.

Morning high blood pressure

|

Sakal

कोमट पाण्याचे सेवन

सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोमट पाणी प्या. यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि रक्ताभिसरण सुधारून बीपी नियंत्रित राहण्यास मदत होते.

Morning high blood pressure

|

Sakal

मिठाच्या प्रमाणावर नियंत्रण

जेवणात मिठाचे प्रमाण वाढल्याने बीपी वाढतो. शक्यतो कमी मीठ खा आणि पाकीटबंद पदार्थ खाणे पूर्णपणे टाळा.

Morning high blood pressure

|

Sakal

पुरेशी झोप घ्या

दररोज ७ ते ८ तास शांत झोप घेतल्याने शरीराला विश्रांती मिळते. झोपेचे चक्र बिघडल्यास सकाळी रक्तदाब वाढण्याची शक्यता दाट असते.

Morning high blood pressure

|

sakal

व्यायाम आणि योगासने

सकाळी १०-१५ मिनिटे चालणे, हलका स्ट्रेचिंग व्यायाम किंवा ध्यान (Meditation) केल्याने तणाव कमी होतो आणि बीपी नॉर्मल राहतो.

Morning high blood pressure

|

Sakal

नियमित मॉनिटरिंग करा

जर तुम्हाला वारंवार हा त्रास होत असेल, तर रोज सकाळी एकाच ठराविक वेळी बीपी चेक करा आणि त्याची नोंद ठेवा.

Morning high blood pressure

|

Sakal

तणावमुक्त सकाळ

दिवसाची सुरुवात शांततेत करा. सकाळी लवकर उठून शांत बसल्याने शरीरातील 'कोर्टिसोल' या स्ट्रेस हार्मोनची पातळी कमी राहते.

Morning high blood pressure

|

Sakal

डॉक्टरांचा सल्ला

जीवनशैलीत बदल करूनही जर सकाळचा बीपी कमी होत नसेल, तर विलंब न करता तज्ज्ञ डॉक्टरांना भेटा आणि वैद्यकीय तपासणी करून घ्या.

Morning high blood pressure

|

Sakal

तरुणांमध्येही वाढतोय लिव्हर कॅन्सरचा धोका; ‘ही’ 4 लक्षणे वेळीच ओळखा

Liver cancer symptoms

|

Sakal

येथे क्लिक करा