सकाळ वृत्तसेवा
श्रीगणेशाला सर्व देवी-देवतांमध्ये सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे. कोणत्याही कामाच्या सुरूवातीला आधी त्याची पूजा केली जाते.
गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा केली जाते या वेळी सर्वजण गणपतीची मूर्ती घरी आणतात आणि अनंत चतुर्दशीला तिचे विसर्जन करतात.
गणेशोत्सव हा तब्बल 10 दिवस चालतो. पण यामागचे नेमके कारण काय आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? आपण आज तेच कारण जाणून घेणार आहोत.
गणेशोत्सव भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला सुरू होतो तर याची समाप्ती अनंत चतुर्दशी रोजी होते, हा उत्सव संपूर्ण १० दिवस साजरा केला जातो.
गणेशोत्सव देशभरात खूप उल्हासाने १० दिवस साजरा केला जातो, असे मानले जाते खी या काळात गणपती बाप्पा देखील पृथ्वीवर भ्रमण करतात.
पौराणिक धारणांनुसार वेदव्यास यांनी भगवान गणेश यांना महाभारत ग्रंथ लिहिण्याची विनंती केली. त्यानंतर गणपती बाप्पांनी १० दिवसात महाभारत लिहीले.
महाभारत लिहीण्याचे काम गणेशाने काहीही न खाता एका जागेवर बसून पूर्ण केले. असे मानले जाते की हे लेखन कार्य अनंत चतुर्दशीच्या दिवशी पूर्ण झाले.
महाभारत लिहील्यानंतर भगवान गणेश यांच्या शरीरावर धूळ जमा झाली होती, जी साफ करम्यासाठी त्यांनी नदीत अंघोळ केली होती, तेव्हापासून हा उत्सव १० दिवस साजरा केला जातो.
यंदा गणेश उत्सव सात सप्टेंबर रोजी सुरू झाला आहे. तर गणपत्ती बाप्पांच्या मूर्तींचे विसरजण अनंत चतुर्दशी म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी होईल.
हिंदू धर्मात गणेश उत्सवाला विशेष महत्व आहे, कारण बाप्पा आपल्या सोबत सर्व संकटे देखील घेऊन जातात आणि त्यामुळे प्रत्येकाच्या घरात सुख आणि समृद्धी येते.