हनुमानाला शेंदूर का लावला जातो? जाणून घ्या पौराणिक कथा!

Aarti Badade

भक्ती आणि शक्तीचे प्रतीक

हनुमानाचा तेजस्वी केशरी शेंदूर हा केवळ श्रद्धेचे प्रतीक नसून, तो अदम्य ऊर्जा, शक्ती आणि विजयाचे प्रतीक मानला जातो.

Importance of sindoor for Hanuman

|

Sakal

माता सीतेचा तो प्रश्न!

रामायणानुसार, एकदा हनुमानाने माता सीतेला कपाळावर शेंदूर लावताना पाहिले आणि कुतूहलाने त्याचे कारण विचारले.

Importance of sindoor for Hanuman

|

Sakal

प्रभू रामांच्या दीर्घायुष्यासाठी

सीतेने उत्तर दिले की, "हा शेंदूर मी माझे पती प्रभू श्रीराम यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या मांगल्यासाठी लावते."

Importance of sindoor for Hanuman

|

Sakal

हनुमानाची अचाट विचारशक्ती

हनुमानाला वाटले की, जर थोडासा शेंदूर लावल्याने रामांचे कल्याण होते, तर मी संपूर्ण शरीराला शेंदूर लावला तर त्यांना किती लाभ होईल!

Importance of sindoor for Hanuman

|

sakal

निस्वार्थ भक्तीचे दर्शन

प्रभू रामांवरील अथांग प्रेमापोटी हनुमानाने आपल्या संपूर्ण शरीराला शेंदूर फासून घेतला, जे त्यांच्या निस्वार्थ भक्तीचे प्रतीक बनले.

Importance of sindoor for Hanuman

|

Sakal

श्रीरामांचा आशीर्वाद

हनुमानाची ही भोळी पण अतूट भक्ती पाहून श्रीराम प्रसन्न झाले आणि त्यांनी आशीर्वाद दिला की, शेंदूर अर्पण करणाऱ्याचे सर्व संकट दूर होईल.

Importance of sindoor for Hanuman

|

Sakal

आजही जपली जाणारी परंपरा

त्या दिवसापासून हनुमानाला शेंदूर लावण्याची परंपरा सुरू झाली; विशेषतः मंगळवार आणि शनिवारी शेंदूर अर्पण केल्याने बल आणि बुद्धी मिळते.

Importance of sindoor for Hanuman

|

Sakal

घरात ‘या’ दिशेला धावणाऱ्या 7 घोड्यांचा फोटो लावा अन् आकर्षित करा पैसा व यश

running horses vastu direction

|

sakal

येथे क्लिक करा