Shubham Banubakode
इस्त्रायल आणि लेबनानमध्ये संघर्षविराम लागू असला तरी सीमावर्ती भागात तणाव कायम आहे. अशातच इस्त्रायलने मोठी लष्करी कारवाई सुरू केली.
Beaufort Castle history
esakal
दक्षिण लेबनानमधील ऐतिहासिक ब्यूफोर्ट किल्ल्यावर इस्त्रायली सैन्याने पुन्हा नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आहे.
Beaufort Castle history
esakal
ब्यूफोर्ट किल्ला सुमारे ९०० वर्षांपूर्वी क्रूसेडर्सनी बांधला होता. हा किल्ला मध्यपूर्वेतील सर्वात मजबूत आणि प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक मानला जातो.
Beaufort Castle history
esakal
उंच कड्यावर वसलेला हा किल्ला लितानी नदीच्या काठी आहे. येथून उत्तरी इस्त्रायल आणि दक्षिण लेबनानचा मोठा भाग सहज दिसतो.
Beaufort Castle history
esakal
या किल्ल्यावर नियंत्रण मिळवणाऱ्या सैन्याला अनेक किलोमीटर दूरपर्यंतच्या हालचाली पाहता येतात. त्यामुळे युद्धात याचे महत्त्व खूप वाढते.
Beaufort Castle history
esakal
१९८२ च्या लेबनान युद्धात इस्त्रायलने हा किल्ला पीएलओकडून ताब्यात घेतला होता. जवळपास १८ वर्षे तो इस्त्रायली सैन्याच्या नियंत्रणात होता.
Beaufort Castle history
esakal
इस्त्रायली लष्कराच्या मते, हिजबुल्लाहने या किल्ल्याखाली बोगदे आणि आधुनिक लष्करी संरचना उभारल्या होत्या. येथून रॉकेट हल्लेही केले जात होते.
Beaufort Castle history
esakal
ब्यूफोर्ट किल्ला केवळ ऐतिहासिक वास्तू नाही, तर आजच्या मध्यपूर्वेतील संघर्षाचे महत्त्वाचं केंद्र बनला आहे.
Beaufort Castle history
esakal
Nargundkar Bhave Samadhi Belagavi
esakal