Anushka Tapshalkar
दैनंदिन आयुष्यात आपली व्यक्तिमत्त्व खुलवण्यासाठी सौंदर्यदृश्यक गोष्टींचा समावेश वाढला आहे.
महिलांबरोबरच आता अनेक पुरुषही स्वतःचं सौंदर्य खुलवण्यासाठी विविध पर्याय निवडतात. त्यात नेलपॉलिशसारख्या छोट्या गोष्टीही मोठी भूमिका बजावत आहेत.
प्रत्येक रंग वेगळी भावना आणि मूड दर्शवतो, त्यामुळे नखांना रंगवणं म्हणजे स्वतःला व्यक्त करण्याचा एक मार्गच झाला आहे.
पण तुम्हाला माहिती आहे का, नेलपॉलिश नेहमी काचेच्या पारदर्शक बाटल्यांमध्येच का असते? हे फक्त रंग दिसावा म्हणून नसून, यामागे वैज्ञानिक कारण आहे.
नेलपॉलिशमध्ये वापरले जाणारे सॉल्व्हेंट्स (विलायक) अत्यंत मजबूत असतात. त्यामुळे त्यांची प्लास्टिकसारख्या इतर मटेरियलसोबत रासायनिक प्रतिक्रिया (Chemical Reaction) होऊ शकते.
काच ही अशी वस्तू आहे जी रसायनांमुळे खराब होत नाही किंवा त्यांच्यासोबत कोणतीही अभिक्रिया करत नाही. म्हणून नेलपॉलिश ठेवण्यासाठी काचेच्या बाटल्यांचा वापर केला जातो.
काचेच्या पारदर्शक बाटलीमुळे नेलपॉलिशचा रंग, घट्टपणा, बाष्प झालं आहे की नाही आणि एक्सपायरी सहज लक्षात येते. त्यामुळे वेळेवर नेलपॉलिश वापरणे किंवा गरज असल्यास नवीन घेणे सोपे जाते.