कोकणात गौरीला मांसाहारी नैवेद्य दाखवताना काय करतात?

Aarti Badade

कोकणात गौरीला मांसाहारी नैवेद्य?

कोकणातील काही कुटुंबांमध्ये ज्येष्ठा गौरीला मटण, चिकन किंवा माशांचा ‘तिकटाचा नैवेद्य’ दाखवण्याची अनोखी परंपरा आहे.

Non-Vegetarian Naivedya Offered During Gauri puja

|

Sakal

गौरी म्हणजे माहेरची लाडकी लेक!

कोकणात गौरीला माहेरवाशिण मानले जाते आणि तिच्या पाहुणचारासाठी घरातील आवडीचे पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात.

Non-Vegetarian Naivedya Offered During Gauri puja

|

Sakal

कोकणच्या आहारसंस्कृतीचाही संबंध!

मासे, मटण आणि इतर मांसाहारी पदार्थ कोकणातील पारंपरिक आहाराचा भाग असल्याने गौरीच्या पाहुणचारातही त्यांचा समावेश केला जातो.

Non-Vegetarian Naivedya Offered During Gauri puja

|

Sakal

मांसाहारी नैवेद्यामागे एक लोककथाही आहे!

पौराणिक लोककथेनुसार गौरी माहेरी येताना तिच्यासोबत आलेल्या शिवगण आणि भूतगणांसाठी मांसाहारी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

Non-Vegetarian Naivedya Offered During Gauri puja

|

Sakal

हा नैवेद्य नेमका कोणासाठी असतो?

लोकपरंपरेनुसार मांसाहारी नैवेद्य गौरीपेक्षा तिच्यासोबत आलेल्या शिवगण किंवा रक्षक शक्तींना तृप्त करण्यासाठी दाखवला जातो.

Non-Vegetarian Naivedya Offered During Gauri puja

|

Sakal

गणपती आणि गौरीच्या नैवेद्यात फरक!

काही घरांमध्ये गणपतीला शाकाहारी नैवेद्य दाखवताना गौरीसाठी मांसाहारी नैवेद्य केला जातो आणि दोघांच्या मध्ये कापडाचा पडदा धरला जातो.

Non-Vegetarian Naivedya Offered During Gauri puja

|

Sakal

‘तिकटाचा दिवस’ म्हणूनही ओळख!

ज्या कुटुंबांमध्ये ही परंपरा पाळली जाते, तिथे गौरी भोजन किंवा विसर्जनाच्या दिवशी मांसाहारी नैवेद्य दाखवण्याच्या दिवसाला ‘तिकटाचा दिवस’ म्हटले जाते.

Non-Vegetarian Naivedya Offered During Gauri puja

|

Sakal

GK: सोनं खरेदी करण्याआधी हॉलमार्किंगचा 'हा' नियम जाणून घ्या! आता किती आहे शुल्क?

old hallmarking charges and rule

|

Sakal

येथे क्लिक करा