रत्नागिरी बनतंय 'काळ्या बिबट्यांचे' माहेरघर! कोकणात का वाढली संख्या?

Aarti Badade

कोकणात काळ्या बिबट्यांचा वावर वाढला

रत्नागिरी आणि आसपासच्या कोकण पट्ट्यात दुर्मिळ काळ्या बिबट्यांचे दर्शन वारंवार होत असून हा भाग त्यांचे केंद्र बनत आहे.

Black Leopard in Ratnagiri Konkan

|

Sakal

काळा रंग : नैसर्गिक जनुकीय बदल

काळ्या बिबट्यांचा रंग हा 'मेलॅनिस्टिक जीन' या जनुकीय बदलामुळे बदलतो; शरीरातील मेलानिन वाढल्याने अंगावरील ठिपके गडद काळे होतात.

Black Leopard in Ratnagiri Konkan

|

Sakal

सदाहरित जंगले ठरतायत अनुकूल

काळ्या बिबट्यांना लपण्यासाठी दाट आणि सदाहरित जंगलांची गरज असते; कोकणातील घनदाट वनराई त्यांच्यासाठी अत्यंत पूरक ठरत आहे.

Black Leopard in Ratnagiri Konkan

|

Sakal

रत्नागिरीत लक्षणीय संख्या

वन्यजीव अभ्यासकांच्या मते, महाराष्ट्रातील इतर अभयारण्यांच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात या बिबट्यांची संख्या १५ ते २० च्या आसपास असू शकते.

Black Leopard in Ratnagiri Konkan

|

Sakal

अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव

अधिवास आक्रसल्यामुळे हे प्राणी अन्नाच्या शोधात गावांजवळ येत आहेत, ज्यामुळे मानव आणि वन्यजीव संघर्ष वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

Black Leopard in Ratnagiri Konkan

|

Sakal

वन विभाग अधिक सतर्क

काळ्या बिबट्यांच्या वाढत्या दर्शनामुळे रत्नागिरीतील वन विभाग अलर्ट झाला असून त्यांच्या अधिवासाच्या संरक्षणासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Black Leopard in Ratnagiri Konkan

|

Sakal

सहअस्तित्व ही काळाची गरज

या दुर्मिळ प्राण्यांचे संरक्षण करतानाच मानवी सुरक्षेसाठी सुरक्षित अंतर राखणे आणि जंगलांचे संवर्धन करणे आवश्यक आहे.

Black Leopard in Ratnagiri Konkan

|

Sakal

100 वर्षं निरोगी जगण्यामागचं जपानी रहस्य काय? जाणून घ्या हार्टसाठी फायदेशीर 5 सवयी

Japanese lifestyle for heart health

|

Sakal

येथे क्लिक करा