Mansi Khambe
जेव्हा तुम्ही ट्रेनने प्रवास करता तेव्हा तुम्ही अनेकदा पाहिले असेल की काही रेल्वे स्थानकांच्या नावासोबत 'रोड' हा शब्द जोडलेला असतो. प्रत्यक्षात त्या शहराच्या नावात 'रोड' नसतो.
जसे की महाराष्ट्रातील वसई रोड रेल्वे स्टेशन,रे रोड रेल्वे स्टेशन, करी रोड, सँडहर्स्ट रोड, चर्नी रोड... तर देशात अशी अनेक रेल्वे स्थानके आहेत ज्यांच्या नावांसोबत रोड हा शब्द जोडलेला असतो.
पण तुम्हाला माहिती आहे का, रेल्वे स्थानकांच्या नावासोबत 'रोड' का जोडला जातो? याचे एक मनोरंजक कारण आहे. जे प्रवाशांसाठी महत्त्वाच्या माहितीशी संबंधित आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, जेव्हा रेल्वे स्थानकाच्या नावासोबत 'रोड' हा शब्द जोडला जातो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की ते स्थानक मुख्य शहरापासून काही अंतरावर आहे.
म्हणजेच, प्रवासी त्या स्थानकावर उतरतील आणि रस्त्याने शहरात जातील. हे चिन्ह प्रवाशांना आधीच सांगते की ट्रेन त्यांना शहराच्या मध्यभागी सोडणार नाही, तर काही अंतरावर सोडेल.
'रोड' नावाच्या अशा स्थानकांशी संबंधित शहराचे अंतर २ किमी ते १०० किमी पर्यंत असू शकते. देशात अशी अनेक रेल्वे स्थानके आहेत ज्यांच्या नावांसोबत हा शब्द जोडला गेला आहे.
यामागे तांत्रिक आणि भौगोलिक कारणे आहेत. कधीकधी शहरापर्यंत रेल्वे लाईन टाकणे खूप कठीण किंवा महागडे होते. उदाहरणार्थ, माउंट अबू हा डोंगराळ भाग आहे.
तेथे रेल्वे लाईन टाकणे खूप महाग झाले असते. म्हणून डोंगराच्या पायथ्याशी अबू रोड या नावाने स्टेशन बांधण्यात आले. तेथून प्रवासी रस्त्याने माउंट अबूला पोहोचतात.
म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही 'रोड' असे लिहिलेल्या स्टेशनवर उतराल तेव्हा लक्षात ठेवा की खरे शहर अजूनही काही अंतरावर आहे.
मात्र आता मुंबई आणि त्याच्या आजुबाजूचे जिल्ह्यांमध्ये मोठ्या सुविधा करण्यात आल्या आहेत. यामुळे आता स्थानकामागे रोड जोडलेले असले तरी तेथे लोकवस्ती जवळच आढळून येत आहे.