Monika Shinde
गुढी पाडवा हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. यावेळी गुढी उभारण्याची परंपरा खूप जुनी आहे.
गुढी उभारताना त्यावर एक उलटा कलश ठेवला जातो, परंतु तुम्हाला यामागील कारण माहिती आहे का? चला, त्याबद्दल जाणून घेऊया.
गुढी पाडवा हा नववर्षाच्या सुरुवातीचा दिवस आहे. यावेळी गुढी उभारताना त्या गुढीवर एक कलश ठेवला जातो, जो समृद्धी, सुख आणि शांतीचा प्रतीक मानला जातो.
उलटा ठेवलेला कलश घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचा संचार करतो.
गुढीवर तांब्याचा कलश ठेवण्याआधी त्यावर स्वस्तिक काढले जाते. स्वस्तिक शुभ चिन्ह मानले जाते, जे सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांती येते.
तांब्याच्या कलशातील कडुलिंबाच्या पानांच्या आणि रेशमी वस्त्राच्या सहाय्याने सकारात्मक आणि सात्त्विक लहरी निर्माण होतात.
गुढी पाडवा, जो मराठी नववर्षाचा प्रारंभ असतो. उलटा ठेवलेला कलश आपल्या जीवनातील अडचणी व नकारात्मक गोष्टींना उलटवून, एक सकारात्मक व उज्ज्वल भविष्य दर्शवतो.
कलश शांती आणि समृद्धीचा प्रतीक आहे. उलटा ठेवलेला कलश हे दर्शवितो की, शांती आणि समृद्धी परत येत आहे.