सकाळ डिजिटल टीम
तुम्ही कधी विचार केला आहे का आकाशाचा रंग निळा का अहे. या मागची कारणं जाणून घ्या.
sky
sakal
सूर्यप्रकाशामध्ये सात रंग असतात: तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, जांभळा आणि पारवा. हे सर्व रंग वेगवेगळ्या तरंगलांबीचे (wavelength) असतात. निळ्या रंगाची तरंगलांबी इतर रंगांपेक्षा कमी आणि लहान असते.
sky
sakal
जेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो, तेव्हा तो वातावरणातील अतिसूक्ष्म नायट्रोजन आणि ऑक्सिजनच्या कणांवर आदळतो. कमी तरंगलांबीमुळे निळ्या रंगाचे विकिरण (विखुरणे) सर्वाधिक होते.
sky
sakal
यामुळे, दिवसा निळा रंग वातावरणात सर्वत्र विखुरला जातो आणि आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो, ज्यामुळे आकाश निळे दिसते.
sky
sakal
लाल रंगाची तरंगलांबी सर्वाधिक असल्यामुळे त्याचे विकिरण सर्वात कमी होते. त्यामुळे तो दूरवरचा प्रवास करू शकतो.
sky
sakal
सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्य क्षितिजावर असतो. त्यावेळी सूर्यप्रकाश अधिक लांबचा प्रवास करत पृथ्वीवर पोहोचतो. त्यामुळे निळा रंग पूर्णपणे विखुरला जातो आणि आपल्यापर्यंत पोहोचत नाही. केवळ कमी विकिरित झालेले लाल, केशरी आणि पिवळे रंग आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतात, ज्यामुळे आकाश लाल किंवा केशरी दिसते.
sky
sakal
ढगाळ वातावरणात पाण्याचे मोठे थेंब असल्यामुळे सर्व रंगांचे विकिरण समान होते आणि त्यामुळे आकाश पांढरे दिसते.
sky
sakal
वायूंचे अणू व कण यांचा आकार प्रकाशाच्या तरंगलांबीपेक्षा लहान आहेत. या अणू व कणांमुळे प्रकाश सगळीकडे पसरत असतो. त्यास रॅलेचे विकिरण असे म्हणतात.
sky
sakal
विकिरणाच्या या प्रकाशात कण सूक्ष्म असल्याने कमी तरंगलांबीचा निळा प्रकाश अधिक विखुरतो व आपल्याला आकाश निळे दिसते. तसे आकाशाला स्वत:चा रंग नसतो. जांभळा रंगही आकाशात विखुरलेला आहे. परंतू आपले डोळे निळ्या रंगाला अधिक लवकर शोषून घेतात. त्यामुळे आकाळ निळे दिसत असते.
sky
sakal
Al Hutaib village Yemen
esakal