Anushka Tapshalkar
पंढरपूरची वारी ही वारकरी संप्रदायाची अत्यंत पवित्र परंपरा आहे. या वारीत तुळशीला विशेष महत्त्व असते. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालून पांडुरंगाच्या भेटीला निघतात.
तुळस ही भारतीय परंपरेत पवित्र मानली जाते. घराघरांत तुळशीचे पूजन होते. विशेषतः महिलांमध्ये तिची उपासना ही नित्यकर्म मानली जाते.
वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. ही माळ भक्तीची ओळख बनते. तुळशीमुळे भक्तात भक्तिरस जागतो असे मानले जाते.
तुळशीच्या पानांमध्ये श्रीविष्णूची ऊर्जा आकृष्ट करणारी शक्ती असते. म्हणूनच ती पांडुरंगाच्या पूजेत अनिवार्य मानली जाते.
तुळशीची मंजिरी विठ्ठलाच्या मूर्तीवर अर्पण केली जाते. ती मंजिरी विष्णू तत्त्व जागृत करत असल्याचे मानले जाते.
तुळशीमंजिरींचा हार मूर्तीच्या मध्यमभागातील श्रीविष्णूरूप क्रिया शक्तीला चालना देतो. त्यामुळे भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात.
संत नामदेव म्हणतात, "तुलसीविण ज्याचे घर, तें तंव जाणावें अघोर". तुळशीचे पूजन, प्रदक्षिणा केल्याने जन्ममरणातून मुक्ती मिळते.
तुळस ही कृष्णसखी मानली गेली असून, पांडुरंग हे विष्णूचे रूप असल्यामुळे तिला पांडुरंगाचीही सखी मानले जाते.
तुळस ही लक्ष्मीचे प्रतीक असून, लक्ष्मी ही विष्णूची पत्नी असल्यामुळे तुळस हे श्रीहरीचे अंश मानले जाते. म्हणूनच घरात तुळस असणे शुभ मानले जाते.