वारकरी वारीत पांढरे कपडे का घालतात?

Monika Shinde

पांढरा रंग म्हणजे शुद्धता

वारी ही केवळ चालण्याची परंपरा नाही, तर ती भक्ती, समर्पण आणि एकतेचा साज आहे. संतांच्या पालखीत सहभागी होणं ही आत्मिक शुद्धीची प्रक्रिया असते.

पांढऱ्या कपड्यांचं प्रतीकात्मक महत्त्व

पांढरा रंग म्हणजे पवित्रता, साधेपणा आणि शांतता याचं प्रतीक. वारीमध्ये सहभागी होणारे वारकरी स्वतःला शुद्ध ठेवण्यासाठी पांढरे कपडे परिधान करतात.

साधेपणाचं प्रतीक

वारी म्हणजे अहंकाराचं विसर्जन. रंगीबेरंगी कपडे हे व्यक्तिमत्त्व दाखवतात, पण पांढरे कपडे समानतेचं आणि निरहंकारतेचं दर्शन घडवतात.

एकरूपता आणि बंधुत्व

हजारो वारकरी जेव्हा एकसारखे पांढरे कपडे घालून चालतात, तेव्हा त्यातून एक सामूहिक भक्तीभाव दिसून येतो. कुणी मोठा, कुणी लहान नाही सगळेच एकसारखे.

संत परंपरेचा आदर

संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांसारख्या संतांनीही साधेपणा आणि पांढऱ्या वस्त्रांचा अंगीकार केला होता. त्यांचं अनुसरण करणं म्हणजे त्यांच्या मार्गावर चालणं.

वारीत भक्तिभावाची उंची

वारी म्हणजे देहभान विसरून भक्तीमध्ये एकरूप होणं. पांढरे कपडे हे त्या भक्तिभावाचं बाह्य रूप.

भक्ती, समर्पण आणि समानता

वारीतील पांढरे कपडे हे केवळ एक पेहराव नाही, तर ते भक्ती आणि समानतेचं जिवंत प्रतीक आहेत. हे कपडे वारकऱ्यांच्या अंतःकरणातली भक्ती आणि संतांच्या शिकवणीचं दर्शन घडवतात.

'विठ्ठल म्हणजे कोण?' याचे भक्तिमय उत्तर

येथे क्लिक करा