Mansi Khambe
सध्या लोक पैश्यांची देवाणघेवाण करण्यासाठी ऑनलाइन पद्धतींचा वापर करतात. मात्र रक्कम मोठी असेल तर अशावेळी चेकचा वापर केला जातो.
'Only' written after amount on cheque
ESakal
चेक भरताना रक्कम अक्षरी लिहिल्यानंतर शेवटी 'फक्त' (Only) हा शब्द लिहिलेला असतो. तर काहीजण त्यावर /- अशी खूणही करतात. पण असे का केले जाते हे तुम्हाला माहितेय का?
'Only' written after amount on cheque
ESakal
चेकवरील रकमेनंतर Only लिहिण्याचे मुख्य कारण म्हणजे सुरक्षा. लिहिलेल्या रकमेत आणखी रक्कम जोडली जाऊ नये, यासाठी रक्कम अक्षरांत लिहिल्यानंतर 'फक्त' असे लिहले जाते.
'Only' written after amount on cheque
ESakal
जर चेकवर 'पंचवीस हजार' अक्षरी लिहिले आणि पुढे पुरेशी रिकामी जागा सोडली, तर कोणीही त्यात आणखी एक शब्द जोडण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे Twenty Five Thousand Only असे लिहिण्याने रक्कम संपली आहे हे सूचित होते.
'Only' written after amount on cheque
ESakal
तसेच रक्कम अंकात लिहितानाही सावधगिरी बाळगली पाहिजे. उदा. चेकवर ₹25,000 लिहिले आहे. या रकमेनंतर स्लॅश आणि डॅशचा वापर करावा. ज्यामुळे अतिरिक्त अंक किंवा चिन्हे जोडण्याची शक्यता कमी होते.
'Only' written after amount on cheque
ESakal
तुमच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी, चेकवर रक्कम अक्षरात लिहिल्यानंतर Only लिहिणे ही एक चांगली खबरदारी मानली जाते. Only न लिहिल्यास चेक आपोआप अवैध ठरतो.
'Only' written after amount on cheque
ESakal
तुम्ही अनेक चेकला वरच्या डाव्या कोपऱ्यात दोन सरळ रेषा पाहिल्या असतील. याला 'चेक क्रॉसिंग' म्हणतात.
'Only' written after amount on cheque
ESakal
चेकवरील डाव्या कोपऱ्यात दोन सरळ रेषांमध्ये "A/C Payee" असे लिहिले असेल तर याचा अर्थ, चेकची रक्कम संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. यामुळे चेकची सुरक्षा वाढते आणि अधिक सुरक्षित पेमेंट करणे शक्य होते.
'Only' written after amount on cheque
ESakal
चेक भरताना, तारीख, प्राप्तकर्त्याचे नाव आणि रक्कम काळजीपूर्वक लिहा. रक्कम अंक आणि अक्षर दोन्हीमध्ये लिहिली पाहिजे. अक्षरातील रकमेनंतर Only असे लिहिणे महत्त्वाचेच.
'Only' written after amount on cheque
ESakal
तसेच अंकातील रकमेनंतर /- हे चिन्ह वापरता येते. चेकवरील सह्या देखील बँकेच्या नोंदीनुसारच केल्या पाहिजेत. जर चेक चुकीचा असेल, तर तो फाडून वापरण्याऐवजी नवीन चेक भरणे अधिक सुरक्षित आहे.
'Only' written after amount on cheque
ESakal